Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश

Nitesh Rane : अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश

0
Nitesh Rane : अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
Nitesh Rane fishermen relief jalna

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे हे देखील उपस्थित होते.(Nitesh Rane)

मत्स्यउत्पादनात मोठी घसरण

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. याचा थेट आणि गंभीर परिणाम मत्स्यउत्पादनावर झाला असून, गेल्यावर्षीच्या 79% मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा ते केवळ 20% पर्यंत खाली आले आहे. यामुळे येथील मच्छीमार बांधवांचे आर्थिक नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला तातडीने निर्देश दिले, तलावातील गाळ काढण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.(Fisheries Maharashtra)

https://www.prahaar.in/2026/09/28/deepak-chahar-three-expensive-bats-stolen-from-the-field-shares-video-and-offers-options/

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची सविस्तर माहिती यावेळी मच्छीमारांना देण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. या पाहणी दौऱ्यादरम्यान मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त (छत्रपती संभाजीनगर) सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Somthana Lake Jalna)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here