Home ब्रेकिंग न्यूज ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि… रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि… रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

0
ReelStar Divya Shinde : डॉक्टरच्या घरात घुसली आणि… रिलस्टार दिव्या शिंदेवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यात  (Pune) सोशल मीडिया रीलस्टार दिव्या शिंदे  (Divya Shinde) हिच्याविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या कामाचे कारण सांगून 65 वर्षीय सेवानिवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तसेच डॉक्टरांकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदेसह अण्णा ऊर्फ आप्पा ढमढेरे आणि अन्य 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते ‘करुणादीप फाउंडेशन’शी जोडले गेले आहेत. या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता.

https://www.prahaar.in/2026/09/27/gold-worth-%e2%82%b9475-crore-smuggled-via-courier-network-major-dri-crackdown-11-arrested/

5 लाख रुपयांची मागणी

या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीच्या कामाच्या मोबदल्यातून दिव्या शिंदे आणि तिच्या साथीदारांनी डॉ. गायकवाड यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. डॉक्टरांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. त्यानंतर घरात घुसून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे घरात गोंधळ निर्माण झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दिव्या शिंदे ही सोशल मीडियावर रील्समुळे चर्चेत आली होती. तिने ‘बिग बॉस मराठी’मध्येही ( Bigg Boss Marathi) सहभाग घेतला होता. फेब्रुवारी 2026 मध्ये शोदरम्यान सहस्पर्धकांना धमकावल्याच्या आरोपानंतर तिला कार्यक्रमातून बाहेर करण्यात आले होते.

आता पुण्यातील या प्रकरणामुळे दिव्या शिंदे पुन्हा चर्चेत आली आहे. डॉ. गायकवाड यांच्या तक्रारीनंतर काळेपडळ पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेतील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here