Home ब्रेकिंग न्यूज Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात

0
Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई : दुष्काळग्रस्त भागातील ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींची लग्न ठरलेली आहेत, त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मदत केली जाणार असल्याची घोषणा शिंदे यांनी शनिवारी केली. (Eknath Shinde)

https://www.prahaar.in/2026/09/26/dcm-eknath-shinde-makes-a-major-promise-immediately-after-the-declaration-of-a-dry-drought-in-maharashtra/

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात मुला मुलींच्या लग्नाचा खर्च कसा करायचा, याची विवंचना त्यांना कायम सतावत असते. दुष्काळ, नापीकी, कर्ज यामुळे मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करता येणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करून याबाबत चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. ज्या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न ठरली आहेत त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले आहे. (Eknath Shinde)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here