सिंधुदुर्ग: राज्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे रविवार, दि. 27 सप्टेंबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या महत्त्वपूर्ण दौऱ्यात ते जिल्ह्यातील भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेणार आहेत.(Nitesh Rane Sindhudurg visit)
दौऱ्याचे नियोजन व वेळापत्रक
-
सकाळी 10:30 वाजता: सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड येथे प्रत्यक्ष भातशेती पीक परिस्थितीची पाहणी.
-
सकाळी 11:00 वाजता: वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे जाऊन भातशेतीच्या स्थितीचा आढावा.
-
दुपारी 12:00 वाजता: जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष आढावा बैठकीस उपस्थिती.
-
दुपारी 3:30 वाजता: कणकवली तालुक्यातील बेळणेखुर्द येथे भातशेती पाहणी.(Nitesh Rane Sindhudurg visit)
-
सायंकाळी 4:30 वाजता: देवगड तालुक्यातील शिरगाव, शेवरे तांबळवाडी येथे शेतशिवाराला भेट.
-
सायंकाळी 5:30 वाजता: वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे पीक परिस्थितीची पाहणी.
https://www.prahaar.in/2026/09/26/the-grand-festival-draws-to-a-close-a-massive-22-hour-procession-and-the-final-farewell-why-exactly-is-the-immersion-of-lalbaugcha-raja-being-delayed/
शेतकऱ्यांशी थेट संवाद आणि प्रशासनाला निर्देश
या दौर्यात पालकमंत्री नितेश राणे हे प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकरी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पिकांच्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेऊन योग्य त्या उपाययोजना व मदतीबाबत ते या बैठकीत आणि पाहणी दौऱ्यात महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहेत. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या जिल्ह्यातील बळीराज्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.(Nitesh Rane Sindhudurg visit)