Home ब्रेकिंग न्यूज Ganpati Visarjan 2026 : ‘पुढच्या वर्षी लवकर या’! मुंबईत 11 व्या दिवशी 430 गणेश मूर्तींचे विसर्जन

Ganpati Visarjan 2026 : ‘पुढच्या वर्षी लवकर या’! मुंबईत 11 व्या दिवशी 430 गणेश मूर्तींचे विसर्जन

0
Ganpati Visarjan 2026 : ‘पुढच्या वर्षी लवकर या’! मुंबईत 11 व्या दिवशी 430 गणेश मूर्तींचे विसर्जन

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबर रोजी गणेशमूर्ती विसर्जनाचा 11वा दिवस पार पडत आहे. दुपारी 1200 वाजेपर्यंत मुंबईत एकूण 430 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींसह घरगुती गणपती आणि गौरी-हरतालिका मूर्तींचा समावेश आहे.

मिळालेल्या अहवालानुसार, 1200 वाजेपर्यंत 8 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. तसेच 416 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय गौरी आणि हरतालिका यांच्या 6 मूर्तींचेही विसर्जन झाले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण 430 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/09/25/bmc-geared-up-for-ganesh-immersion-in-mumbai-25000-personnel-deployed-arrangements-made-for-383-artificial-ponds/

प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जाते

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी होत असल्याने मुंबई महापालिका, पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. विविध विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1200 वाजेपर्यंत झालेल्या गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद झालेली नाही. विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here