Home महाराष्ट्र ठाणे Bhiwandi Viral Video : भिवंडीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एकाच ऑटो-रिक्षात कोंबले तब्बल 17 शाळकरी मुले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Bhiwandi Viral Video : भिवंडीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एकाच ऑटो-रिक्षात कोंबले तब्बल 17 शाळकरी मुले; थरारक व्हिडिओ व्हायरल

0
Bhiwandi Viral Video : भिवंडीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एकाच ऑटो-रिक्षात कोंबले तब्बल 17 शाळकरी मुले; थरारक व्हिडिओ व्हायरल
A staggering 17 schoolchildren crammed into a single auto-rickshaw

भिवंडी : शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भिवंडीच्या रोशन बाग परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ऑटो-रिक्षात क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त, तब्बल 17 शाळकरी मुलांना खचाखच भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि शालेय वाहतुकीतील बेशिस्तीबाबत सर्वत्र तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.(Bhiwandi Viral Video)

https://www.prahaar.in/2026/09/24/indias-aim-is-accurate-anantjeet-parinaaz-win-bronze-medal-at-asian-games/

व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, एका तीनचाकी ऑटो-रिक्षातून एकापाठोपाठ एक तब्बल 17 मुले बाहेर पडताना दिसत आहेत. वाहन चालकाच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे चिमुकल्यांचा जीव धोक्यात आल्याचे पाहून व्हिडिओ बनवणाऱ्या नागरिकाने चालकाला जाब विचारला. यावर चौकशी केली असता, चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे उत्तर दिले की, तो दररोज सुमारे 15 विद्यार्थ्यांना घेऊन जातो आणि त्या दिवशी काही अतिरिक्त मुले आल्याने त्यांना सामावून घेतले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बळी देऊन चालकाकडून अशा प्रकारे प्रवाशांची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केली जात असल्याचे यातून स्पष्ट होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

स्थानिक रहिवाशांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक भागात शाळेसाठी हक्काची स्वतंत्र वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे किंवा बसचे वाढलेले भाडे टाळण्यासाठी काही पालक नाइिलाजास्तव खाजगी ऑटो-रिक्षा चालकांवर अवलंबून असतात. मात्र, याचाच गैरफायदा घेत काही चालक नफ्यासाठी चिमुकल्यांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.(Bhiwandi Viral Video)

https://www.prahaar.in/2026/09/24/fda-launches-special-state-wide-campaign-for-food-safety-during-the-festive-season-suspected-food-stock-worth-%e2%82%b99-76-crore-seized/

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधित ऑटो-रिक्षा चालकाविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. या गंभीर घटनेमुळे आता शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कडक नियंत्रण ठेवण्याची आणि सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here