Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Political News : एकदा जनतेतून निवडणूक लढवा, स्वतःची लायकी कळेल!

Maharashtra Political News : एकदा जनतेतून निवडणूक लढवा, स्वतःची लायकी कळेल!

0
Maharashtra Political News : एकदा जनतेतून निवडणूक लढवा, स्वतःची लायकी कळेल!

– खासदार ओमराजेंचा अंबादास दानवेंना टोला; मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरील टीकेला प्रत्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून उबाठा गटाचे आमदार नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एकदा जनतेतून निवडणूक लढवा, म्हणजे स्वतःची लायकी कळेल’, अशी टीका निंबाळकर यांनी केली. काही जणांना काम नसल्याने उठून समाजमाध्यमांवर पोस्ट करायच्या असतात, असा टोलाही त्यांनी लगावला. (Maharashtra Political News)

जूनच्या अखेरच्या आठवड्यात उबाठा गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली होती. त्यात निंबाळकर यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांनी प्रथमच उबाठा गटातील नेत्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशी पोस्ट समाजमाध्यमावर केली होती. त्यावर निंबाळकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. (Maharashtra Political News)

https://www.prahaar.in/2026/09/24/iit-bombays-mid-semester-exams-on-october-10-and-11-institutes-major-decision-following-student-protests/

‘एक दिवस माझ्यासोबत या. मी जेवढे फोन उचलतो, त्याच्या दहा टक्के फोन तुम्ही घेऊन दाखवा’, असे आव्हानही निंबाळकर यांनी दानवेंना दिले. दुष्काळ, शेतकरी आणि मतदारसंघातील प्रश्नांबाबत आपण काम करत असल्याचे सांगत त्यांनी दानवेंच्या टीकेला उत्तर दिले. (Maharashtra Political News)

मुख्यमंत्र्यांच्या वाहनातून प्रवासाचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनातून भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यासोबत प्रवास केल्याबाबतही निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले. जिल्ह्यातील शेतकरी, पाण्याचा प्रश्न आणि पीकविम्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्या वाहनातून प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले. या वाहनात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकही उपस्थित होते, असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी कोणाचे तोंड पाहण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी या प्रवासाचे राजकीय अर्थ काढू नयेत, असे सूचित केले. (Maharashtra Political News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here