Home ब्रेकिंग न्यूज CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

0
CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार – मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन

वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे मोडले असताना कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वाशिममध्ये केली. २०१६-१७ मधील कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कोरड्या दुष्काळाचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येणार असून पीकविम्याशी संबंधित प्रश्नही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी फडणवीस बुधवारी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी वाशिम जिल्ह्यातील मसाल गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या याबाबत शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

“तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुम्हा सर्वांना मदत करणार आहोत. तुमचे प्रश्न सोडवणार आहोत,” असे फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोरड्या दुष्काळाचा जीआर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पीकविम्याच्या प्रश्नांवरही मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

२०१६-१७ मधील कर्जमाफीच्या वेळी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही, त्या सर्वांना कर्जमाफी देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली. “वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करणार आहोत. तुम्ही काळजी करू नका,” असे त्यांनी सांगितले. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून ऑगस्टमध्ये दुसऱ्या हप्त्यात ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ५ हजार ८६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी !

– मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांचा ताफा मसाल गावातून जात असताना शेतकऱ्यांनी हात उंचावून त्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री यांनी ताफा थांबवून पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद साधला. “मी तुम्हा सर्वांना मदत करणार आहे. तुमचे प्रश्न सोडवणार आहे. तुम्ही काळजी करू नका,” असे त्यांनी सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

– दरम्यान, सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले असून हिरव्या दिसणाऱ्या शेंगांमध्येही दाणे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दुष्काळाचा शासन निर्णय काढून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य तसेच रब्बी पिकांसाठी मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दुष्काळाची मदत डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here