Home क्राईम Jalgaon Crime : मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने घरात आला अन् महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार केले ; रक्ताच्या थारोळ्यात…

Jalgaon Crime : मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने घरात आला अन् महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार केले ; रक्ताच्या थारोळ्यात…

0
Jalgaon Crime : मोबाईल चार्जिंगच्या बहाण्याने घरात आला अन् महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार केले ; रक्ताच्या थारोळ्यात…

Jalgaon Crime : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावच्या निवृत्तीनगरमध्ये मोबाइल चार्जिंगच्या बहाण्याने घरात घुसलेल्या तरुणाने एका 33 वर्षीय महिलेच्या गळ्यावर सर्जिकल ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गायत्री पाटील या महिलेवर हल्ला झाला असून या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. (Jalgaon Crime News)

नेमकं काय घडलं ?

निवृत्तीनगरमधील स्वामी समर्थ केंद्राजवळील दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर गायत्री पाटील या एकट्या असताना परिसरातील सतीश शिंदे हा तरुण त्याठिकाणी आला. मोबाइल डिस्चार्ज झाल्याचे सांगून त्याने घरात प्रवेश केला. मोबाइल चार्जिंगला लावल्यानंतर काही वेळातच गायत्री यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. गायत्री पाटील यांचा आवाज ऐकून खाली राहणारे राकेश पाटील आणि त्यांच्या पत्नीने वर धाव घेतली. त्यावेळी गायत्री या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या, तर सतीश हा घरातच उभा होता. (Jalgaon Crime News)

https://www.prahaar.in/2026/09/23/wife-priest-and-son-murdered-in-azamgarh-accused-killed-in-police-encounter/

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सतीश शिंदे या तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गायत्री यांच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार करण्यात आला असून जखम गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तातडीने जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हल्ला का झाला ? गायत्री या हल्ला करणाऱ्या युवकाला ओळखतात का ? घटनेची काही पार्शवभूमी आहे का याबाजूने आता पोलीस तपास करत आहे. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here