मुंबई : अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतला. पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा, तसेच पिण्याचे पाणी, सिंचन आणि पशुधनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. (Sunetra Pawar)
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुंबई येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन वरूड-मोर्शीतील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या तसेच पाणीटंचाईबाबत माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. (Sunetra Pawar)
https://www.prahaar.in/2026/09/22/use-modern-technology-to-prevent-road-accidents-transport-minister-pratap-sarnaiks-directives/
कोरड्या दुष्काळामुळे परिसरातील पाण्याची पातळी खालावली असून जमिनीतील ओलावा कमी झाल्याने संत्रा आणि मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. कापूस आणि सोयाबीन पिकांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. (Sunetra Pawar)
पाणीसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना
वरूड-मोर्शी तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्प तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे तातडीने बंद करून पिण्याचे पाणी, सिंचन आणि पशुधनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यास सांगण्यात आले.
तसेच स्वर्गीय अजित पवार यांनी मंजूर केलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. मोर्शी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्तावही शासनाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (Sunetra Pawar)
https://www.prahaar.in/2026/09/22/nashik-delayed-rains-and-a-subsidy-deadlock-a-double-whammy-for-nashik-farmers-kharif-crops-in-jeopardy-due-to-a-prolonged-dry-spell/
शेतकरी, नागरिक आणि पशुधनासाठी उपाययोजना
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक आणि पशुधनाला भेडसावणाऱ्या अडचणींचा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. आवश्यक उपाययोजना तातडीने राबवून परिस्थितीची माहिती सातत्याने शासनाला सादर करावी, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
पाणी आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. (Sunetra Pawar)