भारत आणि जापान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर काय होईल? अशी स्थिती होती. मात्र शेवटच्या चेंडूवर जापानला 4 धावांची गरज होती. पण एकच धाव मिळाली आणि भारताला अवघ्या 2 धावांनी विजय मिळाला. या सामन्यात पावसामुळे आउटफिल्ड ओली झाली होती. त्यामुळे सामना पाच षटकांचा करण्यात आला होता. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 4 गडी गमावले आणि 32 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना जापानने 30 धावा केल्या आणि अवघ्या 2 धावांनी जापानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पण विजयाची चव चाखण्यापूर्वी शेवटच्या षटकात ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती आणि वाइड चेंडूवर भारतीय संघाचा संताप पाहायला मिळाला.
पंचांनी वाइड दिला आणि भारतीय खेळाडूंची नाराजी
जापानला विजयासाठी सहा चेंडूत 8 धावांची गरज होती. कर्णधार श्रेयस अय्यरने शेवटचं षटक अक्षर पटेलच्या हाती सोपवलं. या षटकात पहिले दोन चेंडू अक्षरने व्यवस्थित टाकले. पण तिसरा चेंडू टाकताना सलग दोन चेंडू वाइड टाकले. दुसऱ्यांदा वाइड दिल्यानंतर अक्षर पटेलसह भारतीय खेळाडूंचा राग अनावर झाला. अक्षर पटेलने आपली नाराजी स्पष्टपणे जाहीर केली. त्याने पंच ख्रिस थर्गेट यांच्याकडे आक्षेप नोंदवला. खेळाडूंची नाराजी पाहून कर्णधार श्रेयस अय्यरही तात्काळ तिथे आला आणि स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या ख्रिस ब्राउन यांच्यासोबत बोलला. श्रेयसने चर्चा केल्यानंतर ख्रिस ब्राउन यांनी दुसऱ्या पंचांशी चर्चा केली. मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम होते. पण अचानक निर्णय बदलला आणि वाइड दिलेला चेंडू योग्य असल्याचं सांगितलं.
This is clearly a wide
Congratulations 👏 Shreyas Iyer on winning a game by 2 runs begging to umpires vs mighty Japan
Aura so low that you have to fix games vs Japan to have win pic.twitter.com/MQhzGtOWId
— 𝘿𝙖𝙠𝙨𝙝 (@screwgauge77) September 22, 2026
https://www.prahaar.in/2026/09/22/ind-vs-jpn-a-narrow-win-against-japan-what-exactly-happened-in-the-match-know-thrilling-final-over/
वाइड चेंडू दिला तेव्हा काय स्थिती होती?
पंचांनी वाइड चेंडू दिला तेव्हा जापानच्या खात्यात अतिरिक्त धाव आली असती. तसेच एक चेंडू खेळायला मिळाला असता. पण पंचांनी निर्णय फिरवल्याने चेंडू आणि धाव दोन्ही वाया गेलं. वाइड चेंडू देण्यापूर्वी 4 चेंडूत 6 धावांची गरज होती. हा चेंडू वाइड दिला असता तर 4 चेंडूत 5 धावा अशी स्थिती आली असती. त्यामुळे जापानला विजयाच्या जवळ पोहोचणं सोपं झालं असतं. पण पंचांनी निर्णय बदलल्याने जापानपासून विजय दूर गेला.