Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime News : भोंदू खरातसह सहा संशयितांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश, ३ हजार पानी चार्जशीटवर सुनावणी

Nashik Crime News : भोंदू खरातसह सहा संशयितांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश, ३ हजार पानी चार्जशीटवर सुनावणी

0
Nashik Crime News : भोंदू खरातसह सहा संशयितांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश, ३ हजार पानी चार्जशीटवर सुनावणी

Nashik Crime News : दैवी शक्ती आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोककुमार एकनाथ उर्फ ‘कॅप्टन’ खरात याच्यासह सहा संशयितांना मंगळवारी, २२ सप्टेंबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने या प्रकरणात दाखल केलेल्या तब्बल तीन हजार पानी दोषारोपपत्रावर पुढील कायदेशीर कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

ईडीकडून ४२ कोटी ८८ लाखांच्या मनी ट्रेलचा दावा

ईडीने या प्रकरणात ४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणि त्यासंबंधीच्या मनी ट्रेलचा तपास केल्याचा दावा करत तीन हजार पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, सर्व संशयितांची न्यायालयीन उपस्थिती आणि काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकरण पुढील टप्प्यावर जाण्यास विलंब झाला होता. त्यामुळे दोषारोपपत्रावर न्यायालयीन प्रक्रिया अद्याप प्राथमिक टप्प्यातच आहे. मंगळवारी सर्व संशयित प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिल्यास त्यांना दोषारोपपत्राच्या प्रती मिळाल्या आहेत की नाहीत, याची न्यायालयाकडून खातरजमा केली जाऊ शकते. त्यानंतर जामीन किंवा दोषनिश्चितीच्या पुढील प्रक्रियेबाबत न्यायालयाकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/09/21/nashik-dr-manisha-jejurkar-caseillicit-romantic-angle-in-dr-manisha-jejurkars-death-case-police-question-dr-swati-chavan/

कॅप्टन खरातविरोधात अनेक गुन्हे

कॅप्टन खरातविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात २५ मार्च रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ६ एप्रिल रोजी ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) २००२ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा नोंदवला. पोलिसांच्या माहितीनुसार, खरातविरोधात नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता परिसरात एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील एका प्रकरणातील त्याच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

‘या’ सहा संशयितांचा समावेश

– अशोककुमार एकनाथ खरात

– कल्पना अशोक खरात

– अरविंद पांडुरंग बावके

– नामकरण यशवंत आवारे

– अविनाश वामन कांडेकर

– मिलिंद दादासाहेब बनकर

आता मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय या सहा संशयितांच्या उपस्थितीनंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here