Home क्रीडा Asian Games 2026: भारताच्या खात्यात सुवर्णपदक, आशिया कपनंतर एशियन गेम्समध्येही महिला संघाचा डंका

Asian Games 2026: भारताच्या खात्यात सुवर्णपदक, आशिया कपनंतर एशियन गेम्समध्येही महिला संघाचा डंका

0
Asian Games 2026: भारताच्या खात्यात सुवर्णपदक, आशिया कपनंतर एशियन गेम्समध्येही महिला संघाचा डंका
Asian Games 2026: भारताच्या खात्यात सुवर्णपदक, आशिया कपनंतर एशियन गेम्समध्येही महिला संघाचा डंका (Photo: BCCI Women Twitter)

IND W vs SL W Final: एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकन संघाची दाणादाण उडवून दिली आणि सुवर्ण पदक पटकावलं. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 3 गडी गमवून 216 धावा केल्या आणि विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांवर बाद झाला आणि भारताने हा सामना 147 धावांनी जिंकला. यासह एशियन गेम्स 2026 स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं. खरं तर या सामन्यात श्रीलंकन संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेलाला दिसला. भारताने या विजयासह एशियन गेम्स स्पर्धेत आपलं सुवर्ण पदक राखलं. भारतीय महिला संघाचं या स्पर्धेतील सलग दुसरं सुवर्ण पदक आहे.

श्रीलंकन फिरकीच्या जाळ्यात अडकला

एशियन गेम्स 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत फिरकीपटूंचं योगदान महत्त्वाचं होतं. कारण श्रीलंकेचा संपूर्ण संघ फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने अंतिम सामन्यात एकूण 6 गोलंदाजांच्या हाती चेंडू सोपवला. यात चार फिरकीपटूंनी सर्व विकेट काढल्या. दीप्ति शर्माने सर्वाधिक तीन विकेट काढल्या. तर शफाली वर्मा, श्रेयंका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या. श्रीलंकेच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. यात श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू हिने सर्वाधिक 29 धावा केल्या.

https://www.prahaar.in/2026/09/22/ind-vs-jpn-a-narrow-win-against-japan-what-exactly-happened-in-the-match-know-thrilling-final-over/

स्मृती मंधाना आणि शफाली वर्माची आक्रमक सुरूवात

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकन गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. शफाली वर्मा 20 चेंडूत 48 धावा करून बाद झाली. भारताकडून स्मृती मंधानाने 45 चेंडूत 7 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. तर ऋचा घोषने शेवटी येवून 22 चेंडूत नाबाद 49 धावांची खेळी केली.


            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here