Home ब्रेकिंग न्यूज “कांताराप्रमाणेच गोंधळही भारतीय लोकपरंपरेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवेल”, भारताची Oscar मध्ये अधिकृत एंट्री ठरल्यानंतर अभिनेते किशोर कदम यांची प्रतिक्रिया

“कांताराप्रमाणेच गोंधळही भारतीय लोकपरंपरेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवेल”, भारताची Oscar मध्ये अधिकृत एंट्री ठरल्यानंतर अभिनेते किशोर कदम यांची प्रतिक्रिया

0
“कांताराप्रमाणेच गोंधळही भारतीय लोकपरंपरेला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवेल”, भारताची Oscar मध्ये अधिकृत एंट्री ठरल्यानंतर अभिनेते किशोर कदम यांची प्रतिक्रिया
फोटो सौजन्य: किशोर कदम फेसबुक

मुंबई: उत्तम अभिनेता आणि कवी म्हणून मराठी प्रेक्षकांमध्ये घर निर्माण करणारे अभिनेते किशोर कदम सध्या चर्चेत आहेत. कायमच आपल्या सिंपल अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर निर्माण करणाऱ्या किशोर कदम यांच्या ‘गोंधळ’ चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड करण्यात आली आहे. अलीकडेच ‘गोंधळ’ चित्रपटाला ऑस्करमध्ये ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या विभागासाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एकंदरितच दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत.

ETimes सोबत बोलताना अभिनेते किशोर कदम यांनी प्रतिक्रिया दिली की, “जेव्हा मला ‘गोंधळ’ चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड करण्यात आल्याची बातमी कळाली तेव्हा मी मुंबई महापालिकेच्या ऑफिसमध्ये होतो. तेव्हा माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी एका चॅनलने मला व्हॉट्सॲप कॉल केला होता. मला एवढी मोठी बातमी त्या चॅनलकडूनच कळाली. तेव्हा सर्व बीएमसीचे कर्मचारी माझा फोन ऐकत होते. त्यानंतर आणखीन दोन- तीन चॅनलने मला फोन केले. ‘गोंधळ’ चित्रपटाची ऑस्करमध्ये निवड करण्यात आल्याची बातमी संपूर्ण बीएमसीच्या ऑफिसमध्ये वाऱ्यासारखी पसरली. मी माध्यमांना माझी प्रतिक्रिया दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवून माझा सत्कारही केला.”

https://www.prahaar.in/2026/09/21/raghav-chadha-is-proud-of-wife-parineeti-chopra-dedication-for-shaque-trust-no-one-netflix/

किशोर कदम यांच्यासाठी, ‘गोंधळ’ चित्रपट त्यांच्या फिल्मी करियरमधला आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. करियरमध्ये त्यांना अनेक नामांकित चित्रपट निर्मात्यांसोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम करण्याची आणि वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. किशोर कदम यांच्या मते, दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवून वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका दिल्यामुळे मी माझ्या फिल्मी करियरमध्ये इतकी विविधता असल्याचं ते मानतात. “मी स्वतःला खूप भाग्यवान अभिनेता समजतो. कारण ‘नटरंग’मध्ये रवी जाधव, ‘फँड्री’मध्ये नागराज मंजुळे, ‘स्पेशल २६’मध्ये नीरज पांडे, श्याम बेनेगल, अतुल पेठे, सुमित्रा भावे, अमोल पालेकर, सुधीर मिश्रा यांच्यासह अनेक दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला चांगल्या भूमिका दिल्या आहेत.” अशी प्रतिक्रिया किशोर कदम यांनी दिली.

“नाहीतर, ‘फँड्री’मधली भूमिका मला कोणीच दिली नसती. रवी जाधव यांनी ‘नटरंग’मधल्या कॉन्ट्रॅक्टरची भूमिका जर मला दिली नसती, तर आणखी कोणी दिली असती? ‘जोगवा’मधलीही माझी भूमिका इतरत्र भूमिकेपेक्षा फार वेगळी होती. ‘दिठी’ नावाचा एक चित्रपट होता, ज्याचे निर्माते मोहन आगाशे आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे होत्या. मी त्यांच्यासोबत चार-पाच चित्रपट केले; त्या सर्वच चित्रपटांमध्ये माझ्या भूमिका वेगवेगळ्या होत्या.” अशी माहिती सुद्धा किशोर कदम यांनी दिली. ‘गोंधळ’ चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शक संतोष डावखर यांना असलेली सिनेमाबद्दलची समज, ह्या दोन गोष्टी किशोर कदम यांना भावल्याचं त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितल्या. मुलाखतीमध्ये किशोर कदम यांनी ‘गोंधळ’ चित्रपटाबद्दल तोंडभरून कौतुक केलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gondhal (@gondhalfilm)

‘गोंधळ’ चित्रपटाबद्दल बोलताना किशोर कदम यांनी सांगितलं की, “जरीही माझी आणि संतोष डावखर यांच्यासोबत ओळख नसली तरीही ते गेल्या अनेक वर्षांपासून माझं काम पाहत होते. त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवून ‘गोंधळ’ चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यावेळी मी खूप प्रभावित झालो, कारण त्या चित्रपटाची पटकथा अतिशय बारकाईने विणलेली होती.” चित्रपटाविषयी सांगताना किशोर कदम पुढे म्हणाले की, “चित्रपटाची पटकथा वाचताना माझ्या लक्षात आलं की या व्यक्तीला जागतिक सिनेमाची उत्तम जाण आहे. त्यांनी जागतिक सिनेमा पाहिला आहे, पटकथांचा अभ्यास केला आहे, त्यांनी अनेक वर्कशॉप्स केले आहेत आणि या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. मला ही भूमिका मिळाली हे माझं भाग्यच आहे.” चित्रपटाच्या सुरवातीचा सीन माझ्यासाठी या चित्रपटातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होता, अशी माहितीही किशोर कदम यांनी दिली.

“चित्रपटाचा पहिलाच सीन जवळपास २५ ते २७ मिनिटांचा होता, तो आम्ही एका टेकमध्येच शूट केला. एक अभिनेता म्हणून दिग्दर्शकाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हे माझ्यासाठी आव्हानात्मकही होतं आणि आनंददायीही. मी तो सीन चांगला करण्याचा प्रयत्न केला. पण मी तो कसा केला, हे प्रेक्षक ठरवतील.” आता ‘गोंधळ’हा चित्रपट मराठीबरोबरच हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधून महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. चित्रपटाला भाषेची सीमा नसते, हे या चित्रपटाच्या प्रवासातून दिसून येत असल्याचं किशोर कदम यांनी म्हटलं. मला असं वाटतं की, सिनेमाच्या भाषेला भाषेचं अस्तित्वच नसतं. दक्षिण भारतातील लोकांसाठी तमिळ, तेलगू, कन्नड, तुळू भाषा आणि महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर मराठी, कोलकात्यातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बंगाली भाषा पोहोचू शकते, अशी प्रतिक्रियाही अभिनेत्याने दिली.

https://www.prahaar.in/2026/09/21/the-demure-actress-turns-fiercely-aggressive-the-thrilling-teaser-of-the-highly-anticipated-film-maisa-goes-viral-on-social-media/

जेव्हा इतका चांगला चित्रपट वेगवेगळ्या भाषांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, तेव्हा ती खूप आनंदाची गोष्ट असते, कारण त्यामुळे तो अधिक लोक पाहतात. कांताराच्या सक्सेसचं उदाहरण देताना किशोर कदम म्हणाले की, “‘कांतारा’ चित्रपटामध्ये तिथली लोकं आणि त्यांची लोकपरंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचली, त्याचप्रमाणे मला वाटतं की ‘गोंधळ’ चित्रपटही राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here