मुंबई : मुंबईच्या गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून सामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वच जण बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ (Actor Jacky shroff) यांनी मुंबईतील अत्यंत मानाच्या आणि प्रसिद्ध अशा ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’चे (Chinchpokalicha Chintamani) दर्शन घेतले. दर्शनादरम्यान त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खास आणि अनोख्या शैलीत चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करत आशीर्वाद मागितले.
&
View this post on Instagram
१९२० सालापासून सुरू झालेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे हे १०७ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी चिंतामणीची मूर्ती भगवान व्यंकटेश (तिरुपती बालाजी) यांच्या भव्य आणि नयनरम्य रुपात साकारण्यात आली आहे, ज्यामुळे भक्तांमध्ये दर्शनासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ऐतिहासिक आणि भव्य पांडालमध्ये सर्वसामान्यांसोबतच अनेक दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत असून, जॅकी श्रॉफ यांच्या या खास हजेरीने चिंतामणीच्या दरबारातील उत्साह आणखी वाढवला आहे.