Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime News : वाहनातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांना संशय आला अन्…; बंद चारचाकीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Nashik Crime News : वाहनातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांना संशय आला अन्…; बंद चारचाकीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
Nashik Crime News : वाहनातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांना संशय आला अन्…; बंद चारचाकीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Nashik Crime News : नाशिकशहरात एकीकडे गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू असतानाच, दुसरीकडे पंचवटीतील अत्यंत वर्दळीच्या मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी (दि.२१) सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. नाशिकच्या पंचवटी परिसरात बंद चारचाकी वाहनामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

येथे उभ्या असलेल्या एका मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला आहे. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

दुर्गंधीमुळे नागरिकांना संशय

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित मृतदेह मागील दोन दिवसांपासून वाहनात असल्याचा अंदाज आहे. वाहनातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर परिसरातील नागरिकांना संशय आला. मालेगाव स्टॅण्ड परिसरात उभ्या असलेल्या मारुती ओमनी (एमएच १५ जीआर ८९७४) वाहनाच्या मागील दोन सीटांमधील मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, वाहनात (Vehicle) आणि थेट रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ पसरलेले दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवलं. माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

https://www.prahaar.in/2026/09/21/nashik-crime-news-the-8-month-old-baby-girl-has-finally-been-found-but-how-did-she-end-up-in-yeola-the-mystery-surrounding-the-nandgaon-case-remains-unsolved/

मृत्यूचं नेमकं कारण काय ?

मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीची ओळख पटवणं हे सध्या पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. संबंधित चारचाकी वाहन कोणाच्या नावावर आहे, मृत व्यक्ती वाहनात कशी आली आणि तिचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेह गेल्या दोन दिवसांपासून वाहनात असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने मृत्यूची वेळ आणि त्यापूर्वी नेमकं काय घडलं, याबाबतही तपास केला जात आहे.

पंचवटी पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेमुळे पंचवटी परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. मृतदेहाची ओळख आणि मृत्यूचं नेमकं कारण समोर आल्यानंतर या प्रकरणातील पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here