Home क्रीडा Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला आणखी एक रौप्यपदक, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीमने मिळवून दिलं पदक

Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला आणखी एक रौप्यपदक, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीमने मिळवून दिलं पदक

0
Asian Games 2026 : नेमबाजीत भारताला आणखी एक रौप्यपदक, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीमने मिळवून दिलं पदक

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने नेमबाजीत आणखी एक रौप्यपदक पटकावलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्ये पार्थ माने, रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशु ढिल्लन यांच्या भारतीय संघाने शानदार कामगिरी करत सिल्व्हर मेडल मिळवलं.

भारतीय त्रिकुटाची दमदार कामगिरी

10 मीटर एअर रायफल पुरुष टीम इव्हेंटच्या फायनलमध्ये भारतीय संघाने 1890.1 गुण मिळवत दुसरं स्थान पटकावलं. यामध्ये रुद्रांक्ष पाटीलने 631.8, हिमांशु ढिल्लनने 630.0, तर पार्थ मानेने 628.3 गुणांची नोंद केली. या स्पर्धेत चीनने 1899 गुणांसह सुवर्णपदक पटकावलं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने 10 मीटर एअर रायफल महिला टीम इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदरसा विनोद यांच्या भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. यानंतर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीम इव्हेंटमध्येही भारताला रौप्यपदक मिळाल्याने नेमबाजीत भारताची दमदार सुरुवात कायम राहिली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/20/indian-shooters-make-a-strong-start-at-the-asian-games-with-a-double-medal-haul-elavenil-wins-individual-silver/

इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्येही पदकाची आशा

दरम्यान, रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशु ढिल्लन यांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलच्या इंडिव्हिज्युअल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रँकिंगमध्ये रुद्रांक्ष तिसऱ्या, तर हिमांशु सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, पार्थ माने इंडिव्हिज्युअल फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पुरुषांच्या टीम स्पर्धेतील रौप्यामुळे भारतीय नेमबाजांनी एशियन गेम्सच्या सुरुवातीपासूनच पदकांची मालिका कायम ठेवली आहे. आता रुद्रांक्ष पाटील आणि हिमांशू ढिल्लों यांच्या वैयक्तिक अंतिम फेरीकडेही भारतीयांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे आता रुद्रांक्ष आणि हिमांशु यांच्याकडून भारताला आणखी एका पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात  आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here