नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सर्वाधिक उत्सुकतेची गोष्ट असते ती डेकोरेशनची… गणेशोत्सव सण हा खरंतर मराठमोळ्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा सण आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या थीमच्या आधारावर डेकोरेशन करत सणाचा गोडवा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. नवी मुंबईतील सीवूड्समध्ये दोन भावंडांनी त्यांच्या घरामध्ये अक्षरश: बनारस शहराची प्रतिकृती साकारलीये. बहिण- भावाने साकारलेल्या ह्या अनोख्या प्रतिकृतीने दर्शनासाठी येणारे प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधले.
https://www.prahaar.in/2026/09/20/central-railways-massive-crackdown-over-%e2%82%b9140-crore-in-fines-recovered-from-18-03-lakh-ticketless-passengers/
उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणांची प्रतिकृती डेकोरेशनमध्ये साकारण्यात आले आहे. मणिकर्णिका घाट, प्रयाग घाट, दशाश्वमेध घाट, चेतसिंग घाट आणि हरिश्चंद्र घाट असे पाच महत्त्वाचे ठिकाण सीवूड्समधील सेक्टर ३६ मध्ये राहणाऱ्या दिशा आणि दक्ष नावाच्या भावंडांनी हा चित्ररथ उभारला आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धार्मिक स्थळावरच आपण प्रत्यक्षात आलोय की काय? याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. नदीकिनारी असलेल्या वास्तुकला, परंपरा आणि दैनंदिन जीवनाची झलक या डेकोरेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
https://www.prahaar.in/2026/09/20/mumbais-first-metro-integrated-flyover-to-transform-east-west-connectivity-open-in-phases-by-2027/
सुमारे ५ फूट रूंद आणि जवळजवळ ८ फूट उंच असलेली ही कलाकृती तयार करण्यासाठी दिशा आणि दक्ष यांना जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला. त्यांनी गणपतीचं डेकोरेशन बनवण्यासाठी सुरूवात १५ ऑगस्टपासून केली होती. डेकोरेशन करण्यापूर्वी दिशा आणि दक्ष यांनी ऑनलाईन सविस्तर संशोधन करत संपूर्ण डेकोरेशन तयार केलं आहे. या चित्ररथात ‘नमामि गंगे’ कार्यक्रमाचाही समावेश असून, नदी संवर्धनाचा मुद्दा सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे. अत्यंत प्राचीन आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या वाराणसी नगरीतील गंगा नदीवरील घाटाची नयनरम्य प्रतिकृती साकारलेली पाहायला मिळते. वाराणसीच्या घाटांची रचना, पायऱ्या आणि तेथील पारंपरिक वातावरणाचा हुबेहूब देखावा तयार केला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/20/mhada-has-announced-the-master-plan-for-the-redevelopment-of-motilal-nagar-15-acre-green-space-will-be-created-in-goregaon-west/
वाराणसीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणाचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न दिशा आणि दक्ष यांनी केलेला आहे. प्रत्येक देखाव्यामध्ये त्यांनी नागरिकांना काही सामाजिक संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. महत्त्वाचे संदेश देणाऱ्या देखाव्याची सध्या सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. दिशा आणि दक्ष यांनी रिसर्चच्या आधारावर केलेल्या ह्या डेकोरेशनने प्रत्येकाच्याच मनामध्ये घर केलेलं आहे. अनेकांनी त्यांच्या देखाव्याचं कौतुक सुद्धा केलंय.