मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. काही मिनिटांपूर्वीच दीपिकाने दुसऱ्यांदा मुलगी झाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी एका गोंडस चिमुकलीला दीपिकाने जन्म दिला आहे. दीपिका- रणवीरच्या घरी दुसऱ्यांदा गौराईचे आगमन झाल्याने बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून या जोडप्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
https://www.prahaar.in/2026/09/19/the-first-film-of-orange-juice-gang-is-now-home-bhootam-bhayam-releases-on-ott-from-25th-september/
दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, सेलिब्रिटी कपलने ‘वेलकम बेबी गर्ल’ असा आशय लिहिलेली इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. दीपिका आणि रणवीर बाळाला जन्म देण्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे, शुक्रवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते, त्यामुळे लवकरच तिची प्रसूती होईल अशा चर्चा होत्या. दुआच्या जन्मावेळीही सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिची प्रसूती झाली होती. आधीप्रमाणेच यावेळी गणेशोत्सवातच दीपिका व रणवीर यांनी आपल्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं. सप्टेंबर २०२४ मध्ये रणवीर- दीपिकाने पहिल्या मुलीला जन्म दिला होता. जिचं नाव त्यांनी दुआ असं ठेवलं होतं. दुआ आता मोठी बहिण झाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची पहिली भेट २०१२ मध्ये सिंगापुरमधील ‘झी सिने अवॉर्ड्स’ दरम्यान झाली होती. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, ‘गोलियों की रासलीला: राम-लीला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांच्यातील जवळीक वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘राम-लीला’नंतर या जोडीने ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. एकमेकांना ६ वर्षे डेट केल्यानंतर दीपिका- रणवीरने ऑक्टोबर २०१८ मध्ये लग्नाची घोषणा केली. लग्नाची घोषणा केल्यानंतर कपलने नोव्हेंबर २०१८ मध्ये, इटलीत लग्नगाठ बांधली.
https://www.prahaar.in/2026/09/19/following-the-selection-of-the-gondhal-movie-for-the-oscar-2027-director-santosh-davkhar-announced-that-the-movie-would-be-re-released-in-marathi-as-well-as-other-languages/