Home ब्रेकिंग न्यूज Gondhal Movie News: ऑस्करवारीनंतर ‘गोंधळ’ च्या दिग्दर्शकांनी केली महत्त्वाची घोषणा, संतोष डावखरांची OTT रिलीजवरही प्रतिक्रिया

Gondhal Movie News: ऑस्करवारीनंतर ‘गोंधळ’ च्या दिग्दर्शकांनी केली महत्त्वाची घोषणा, संतोष डावखरांची OTT रिलीजवरही प्रतिक्रिया

0
Gondhal Movie News: ऑस्करवारीनंतर ‘गोंधळ’ च्या दिग्दर्शकांनी केली महत्त्वाची घोषणा, संतोष डावखरांची OTT रिलीजवरही प्रतिक्रिया
Following the selection of the Gondhal movie for the Oscar 2027 director Santosh Davkhar announced that the movie would be re-released in Marathi as well as other languages

मुंबई: दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या पहिल्याच कलाकृतीने ऑस्कर गाठलं आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून ‘गोंधळ’ चित्रपट हा पहिला चित्रपट आहे. ऑस्कर २०२७ साठी ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाला भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटगरीसाठी ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’कडून चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. चित्रपटाची ऑस्करवारी होत असताना आता चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/19/golmaal-5-release-date-when-will-golmaal-5-be-released-rohit-shetty-makes-a-big-announcement/

महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखली जाणारी ‘गोंधळ’ ही संकल्पना चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी मांडली आहे. ऑस्करमध्ये चित्रपटाची निवड झाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून हा चित्रपट आम्हाला कुठे पाहता येईल? असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या प्रेक्षकांनी अजूनही ‘गोंधळ’ चित्रपट पाहिला नाही, अशा प्रेक्षकांसाठी गुड न्यूज आहे. गोंधळ चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. मराठीसह अन्य भाषांमध्येही हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती दिग्दर्शकांनी चाहत्यांना दिली आहे. अलीकडेच दिग्दर्शकांनी व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gondhal (@gondhalfilm)

‘गोंधळ’ चित्रपटाच्या टीमकडून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात की, “नमस्कार मंडळी, प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला प्रेक्षकांकडून “आम्हाला ‘गोंधळ’ चित्रपट पाहायचा आहे, कुठे पाहता येईल?”असा वारंवार प्रश्न विचारला जात होता. पण आता प्रेक्षकांनो टेंशन घेण्याची काहीही गरज नाही. आता आम्ही लवकरच काही मोजक्याच थिएटरमध्ये पुन्हा एकदा ‘गोंधळ’ चित्रपट रिलीज करणार आहोत. मराठीसोबतच इतरत्र भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. आम्हाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहेत. एफएफआयच्या ज्युरीने ‘गोंधळ’वर दाखवलेला विश्वास आमच्या त्या भूमिकेला आणखी बळ देणारा आहे.”

अद्याप तरी दिग्दर्शकांकडून ‘गोंधळ’ चित्रपट कोणकोणत्या भाषेत रिलीज केला जाणार? याची माहिती दिलेली नाही. सध्या तरी महत्त्वाच्या आणि मोजक्या थिएटरमध्ये पुन्हा एकदा ‘गोंधळ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजणार, यामध्ये शंका नाही. दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना ‘गोंधळ’ चित्रपट मोबाईलवर किंवा टिव्ही स्क्रिनवर न पाहता थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचा सल्ला दिला आहे. चित्रपटाची भव्य- दिव्यता तुम्हाला थिएटरमध्येच अनुभवता येईल, असा विश्वास सुद्धा दिग्दर्शकांनी व्हिडिओमध्ये व्यक्त केला आहे. टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांना ‘गोंधळ’ चित्रपट थिएटरमध्येच पाहयला मिळणार आहे. सध्या तरी चित्रपटाच्या टीमकडून ‘गोंधळ’ चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याचं नियोजन नाही, अशी माहिती दिग्दर्शकांना दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/19/kbc-18-hasnt-seen-her-daughter-for-24-years-amitabh-bachchan-gets-emotional-upon-hearing-kapila-tanejas-story/

‘गोंधळ’ चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती डावखर फिल्म्सने केली. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here