Home ब्रेकिंग न्यूज Railway Megablock Update: प्रवाशांनो रविवारी ठाणे- कल्याण मार्गिकेवर मेगाब्लॉक; हार्बर- पश्चिम मार्गिकेची स्थिती काय?

Railway Megablock Update: प्रवाशांनो रविवारी ठाणे- कल्याण मार्गिकेवर मेगाब्लॉक; हार्बर- पश्चिम मार्गिकेची स्थिती काय?

0
Railway Megablock Update: प्रवाशांनो रविवारी ठाणे- कल्याण मार्गिकेवर मेगाब्लॉक; हार्बर- पश्चिम मार्गिकेची स्थिती काय?
no mega blocks scheduled on Mumbai local train Central Harbour Trans-Harbour Uran and Western lines for Sunday 20th September 2026

मुंबई: रविवारी २० सप्टेंबर रोजी, मध्य रेल्वेवरील ठाणे- कल्याण मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळी काही कामानिमित्त घराबाहेर पडणार असाल, तर ही बातमी नक्कीच वाचा. रविवारी मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉकच्या वेळेमध्ये सर्व लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसची वाहतूक लोकलच्या जलद मार्गिकेवरून केली जाणार आहे. याचा फटका उपनगरीय रेल्वेला अर्थात लोकल सुद्धा बसण्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/09/19/we-are-also-mumbaikars-appearance-of-the-chitnis-family-from-parel-call-from-ganeshotsav-for-the-protection-of-marine-life/

ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस धावतात. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता रविवारी (२० सप्टेंबर) मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे मार्ग वळवण्यात येणार असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. ब्लॉकच्या कालावधीमध्ये डाऊन दिशेच्या लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे उपनगरीय रेल्वे नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.

 

11029 मुंबई सीएसएमटी- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर गोदान एक्सप्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्सप्रेस, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकल ठाणे- कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. 22226 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, 11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, 12124 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस, 12126 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस, 12134 मंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 13201 राजगीर- लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस, 17221 काकीनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस, 12321 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल, 12812 हतिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17611 नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस आणि 22160 चेन्नई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस या सर्व ‘अप’ दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व लांबपल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरीय गाड्या आपल्या गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत.

https://www.prahaar.in/2026/09/19/incident-involving-use-of-chatgpt-during-exam-protest-on-campus-following-students-death/

मेमू लोकल सेवा सुद्धा बंद असणार आहे. काही मेमू लोकल शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. वसई रोड स्थानकावरून सकाळी ९.५० वाजता सुटणारी वसई रोड- दिवा मेमू रेल्वे कोपर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे. तर, दिवा स्थानकावरून सकाळी ११.३० वाजता सुटणारी दिवा- वसई रोड मेमू रेल्वे कोपर स्थानकावरून सकाळी ११.४५ सोडण्यात येणार आहे. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान मेमू सेवा रद्द करण्यात आली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट रेल्वे मार्गावर कोणताही ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेवरील मुंबई सीएसएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान, हार्बर लाईनवरील मुंबई सीएसएमटी ते पनवेल विभाग (ज्यामध्ये ट्रान्स-हार्बर लाईन आणि बेलापूर-उरण पोर्ट लाईनचाही समावेश आहे) आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार- डहाणू रोड या मार्गिकेवर कोणताही ‘मेगाब्लॉक’ घेतला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here