Home क्राईम Raigad Crime : रायगड हादरले! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार; नेरळ पोलिसांच्या तत्परतेमुळे दोघे जाळ्यात

Raigad Crime : रायगड हादरले! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार; नेरळ पोलिसांच्या तत्परतेमुळे दोघे जाळ्यात

0
Raigad Crime : रायगड हादरले! अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार; नेरळ पोलिसांच्या तत्परतेमुळे दोघे जाळ्यात
Raigad Crime

रायगड : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात नेरळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.(Raigad Crime)

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे हजारे नगर (नेरळ) येथील ‘भोपेले लक्ष्मी कॅस्टीलो’ या इमारतीच्या ‘सी’ विंगमधील रूम नंबर ४०६ (चौथा मजला) येथे अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या दोन मित्रांसोबत (आरोपी क्र. १ व २) राहत होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण माहिती असतानाही, दोन्ही आरोपींनी तिच्याशी शारीरिक लगट केली. तसेच, तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या नृशंस अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे वैद्यकीय व पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.(Raigad Crime)

पोलिसांची कठोर कारवाई आणि गुन्हा दाखल

https://www.prahaar.in/2026/09/19/drone-attack-on-russias-kursk-nuclear-power-plant-iaea-expresses-concern-raising-questions-about-nuclear-safety/

घटनेचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून नेरळ पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि दोन्ही संशयित आरोपींना जेरबंद केले. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०९/२०२६ नुसार खालीलप्रमाणे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  • भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३: कलम ६४, ६४(२)(एफ), ६५(१), ७४, ७९, आणि ३(५)

  • पॉक्सो (POCSO) कायदा, २०१२: कलम ४, ६, ८ आणि १२

या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) वरक करत आहेत. अल्पवयीन मुलीवरील या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Raigad Crime)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here