मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या घाई गडबडीमध्ये अपघात होण्याचा प्रकार घडताना आपण पाहिलं असेल. रेल्वेतून उतरताना किंवा पकडताना प्रवाशाचा निष्काळजीपणा त्याच्या अंगलट येतो. पण नशीब बलवत्तर म्हणून, बऱ्याचदा रेल्वे पोलीस आणि होम गार्ड अनेकदा या प्रवाशांच्या मदतीला धावून येतात आणि त्याचे प्राण वाचवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक प्रवासी चालती लोकल पकडण्याचं धाडस करतोय. पण त्याला लगेचच काही आरपीएफ जवानांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.
https://www.prahaar.in/2026/09/18/thane-fire-5-temporary-structures-gutted-near-kharegaon-bridge-after-cylinder-blast/
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी स्थानकावरील १६ सप्टेंबरच्या रात्रीची ही घटना आहे. ‘गेम्स ऑफ रेल्वे’ नावाच्या एक्स अकाऊंटवर घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. धावती लोकल पकडताना काही दुर्घटना घडण्याच्या अगोदरच दोन आरपीएफ जवानांनी त्या प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. पोलिसांनी त्या तरूणाचे प्राण वाचवले असून त्याला एक प्रकारे जीवनदान देण्याचे काम केले आहे. सध्या ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओपाहून अनेकांनी आरपीएफ जवानाचं कौतुक केलं आहे. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालाय.
जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील थरार! RPF जवानानी प्रवाशाला दिले जीवनदान
.
.#ViralVideo #MumbaiNews #MumbaiLocal #MumbaiRailway #WesternRailway #JogeshwariStation #RPFPolice #prahaarnewsline #MarathiNews pic.twitter.com/kNL7TNC8jl— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) September 18, 2026
या व्हिडीओला अवघ्या काही तासांमध्ये, २९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. कोणताही वेळ न घालवता पोलिसांनी वाचवलेल्या जीवाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. आरपीएफ जवान कायमच दिवस असो किंवा रात्र डोळ्यामध्ये तेल घालून प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकदा लोकलच्या दरवाज्यामध्ये लटकणाऱ्या प्रवाशांना ओरडण्याचं काम सुद्धा ते करत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलिसांची कार्यतत्परता अधोरेखित झाली आहे.
https://www.prahaar.in/2026/09/18/ganeshotsav-2026-mumbai-civic-body-issues-guidelines-on-food-safety-fire-safety-and-cleanliness/