Home देश Pitbull Attack : बाळाला कडेवर घेऊन बाहेर पडताच पिटबुलचा भयानक हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Pitbull Attack : बाळाला कडेवर घेऊन बाहेर पडताच पिटबुलचा भयानक हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

0
Pitbull Attack : बाळाला कडेवर घेऊन बाहेर पडताच पिटबुलचा भयानक हल्ला; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

सोनीपत : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात पाळीव पिटबुल कुत्र्याने 6 महिन्यांच्या बाळावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिक्का कॉलनी परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात बाळ गंभीर जखमी झालं असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या रोहतक येथील PGI रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

https://www.prahaar.in/2026/09/18/how-to-perform-the-radha-ashtami-puja-for-happiness-peace-and-prosperity-read-the-complete-step-by-step-ritual/

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला 6 महिन्यांच्या बाळाला घेऊन जात होती. त्याचवेळी पिटबुल कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे महिलेचा तोल गेला आणि ती बाळासह खाली पडली. यानंतर कुत्र्याने बाळाला पकडलं. बाळाला वाचवण्यासाठी महिलेने आरडाओरड करत मदत मागितली.

घटनेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले. काही नागरिकांनी काठ्यांच्या मदतीने कुत्र्याला बाळापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याने बाळाला सोडले नाही. काही वेळाच्या प्रयत्नानंतर नागरिकांना बाळाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका करण्यात यश आलं.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल 

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पिटबुल बाळावर हल्ला करताना दिसत असून महिला मदतीसाठी ओरडताना दिसते. नागरिक कुत्र्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कुत्र्याच्या मालकाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हल्ल्याच्या वेळी मालकाची प्रतिक्रिया काय होती, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर लहान मुलांच्या आसपास पाळीव कुत्रे ठेवताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे.

सहा महिन्यांच्या बाळावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बाळाची प्रकृती आणि या प्रकरणात प्रशासनाकडून पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here