Home ब्रेकिंग न्यूज Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार

Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार

0
Ahilyanagar News: नगरकरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले, यंदा सरकारी कॉलेज सुरू होणार
Approval granted for 100 seats at Ahilyanagar Punyashlok Ahilyadevi Holkar Medical College

अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, हे नगरकरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय’ या नावाने २०२६ पासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या बद्दलच्या साशंकतांना पूर्णविराम मिळाला आहे.

https://www.prahaar.in/2026/09/17/launch-of-various-initiatives-at-film-city-by-cultural-affairs-minister-ashish-shelar/

अहिल्यानगरला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ४५० खाटांच्या रुग्णालयास सरकारने आधीच मान्यता दिली होती. त्यानुसार हे महाविद्यालय यावर्षीपासून सुरू होणे अपेक्षित होते. पण, २०२६- २७ या वर्षासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे केलेले अपीलही फेटाळण्यात आले होते. आता याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १५ सप्टेंबर रोजी प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशास परवानगी दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/17/nandurbar-news-class-10-female-student-commits-suicide-at-ashram-school/

नगर शहर परिसरातील हे दुसरे वैद्यकीय महाविद्यालय असणार आहे. याआधी विळद घाटात विखे फाउंडेशनचे खासगी वैद्यकीय महाविद्यालय आधीपासून सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरापासून सुमारे पाच किलोमीटरवरील कापूरवाडी परिसरात सुरू होणार आहे. तेथील इमारती व इतर सुविधा निर्माण होईपर्यंत हे महाविद्यालय नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या आयुष विभागात सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here