Home गणेशोत्सव Lalbaugcha Raja eco friendly plates : लालबागच्या राजाचा प्रसाद आता ‘इको-फ्रेंडली’ ताटात; प्लास्टिकला फाटा देत १,५८० किलो कार्बन उत्सर्जन रोखले

Lalbaugcha Raja eco friendly plates : लालबागच्या राजाचा प्रसाद आता ‘इको-फ्रेंडली’ ताटात; प्लास्टिकला फाटा देत १,५८० किलो कार्बन उत्सर्जन रोखले

0
Lalbaugcha Raja eco friendly plates : लालबागच्या राजाचा प्रसाद आता ‘इको-फ्रेंडली’ ताटात; प्लास्टिकला फाटा देत १,५८० किलो कार्बन उत्सर्जन रोखले
Lalbaugcha Raja eco friendly plates

मुंबई : ‘लालबागच्या राजा’च्या (Lalbuagcha Raja 2026) चरणी लीन होणाऱ्या लाखो भाविकांसाठी यंदा एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहे. बाप्पाच्या दर्शनानंतर भाविकांना मिळणारा प्रसाद (भोग) आता १०० टक्के नैसर्गिकरीत्या विघटन होणाऱ्या (Biodegradable) ताट-वाट्यांमध्ये दिला जात आहे. सिंगल-यूज प्लास्टिकला पूर्णपणे फाटा देण्यासाठी मंडळाने हे पाऊल उचलले आहे.

उसाच्या चोथ्यापासून तयार केल्या ताट-वाट्या

गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक मूर्ती आणि नैसर्गिक साहित्याच्या वापरावर विशेष भर दिला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून लालबागच्या राजाच्या प्रसादासाठी ‘चक’ (CHUK) या ब्रँडच्या इको-फ्रेंडली ताट-वाट्यांचा वापर केला जात आहे. ही भांडी उसाचा रस काढल्यानंतर उरणाऱ्या चोथ्यापासून (बगॅस – Bagasse) तयार केली जातात. ही भांडी वापरून फेकून दिल्यानंतर काही दिवसांतच मातीत पूर्णपणे मिसळून जातात.

https://www.prahaar.in/2026/09/17/sanjay-lathkar-sanjay-lathkar-an-officer-from-maharashtra-appointed-as-director-general-of-the-department-of-atomic-energy/

पर्यावरणाला मोठा दिलासा

जीवाश्म इंधनापासून बनणारे प्लास्टिक शेकडो वर्षे कचऱ्याच्या रूपात पर्यावरणात राहून प्रदूषण पसरवते. मात्र, उसाच्या चोथ्यापासून बनवलेल्या या ताट-वाट्यांमुळे लालबागच्या राजाच्या १० दिवसांच्या उत्सवादरम्यान सुमारे १,५८० किलो कार्बन डायऑक्साइड समतुल्य (CO2 equivalent) होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे.

इतर मंडळांनीही हा आदर्श घ्यावा

“लालबागच्या राजासारख्या अथांग लोकसंख्या आणि प्रचंड गर्दी असलेल्या उत्सवात अशा पर्यावरणपूरक भांड्यांचा वापर होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे हजारो टन प्लास्टिक कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचतो आणि पुन्हा मातीत मिसळतो. इतर गणेशोत्सव मंडळांनीही प्लास्टिकला फाटा देत हाच मार्ग स्वीकारावा,” असे पक्का लिमिटेडच्या ‘चक’ विभागाचे प्रमुख शुभम तिब्रेवाल यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर अन् महाकुंभातही याच ताटांचा वापर

विशेष म्हणजे, यापूर्वी अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रसादाच्या वितरणासाठी याच कंपनीच्या इको-फ्रेंडली ताट-वाट्यांचा वापर करण्यात आला होता. याशिवाय माता वैष्णोदेवी मंदिर, प्रयागराज येथील महाकुंभमेळा आणि पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेसारख्या देशातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्येही या पर्यावरणपूरक भांड्यांचा यशस्वी वापर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here