नवी दिल्ली: सण आणि आगामी लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आणि आभूषण उद्योगाला मोठा झटका बसला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, भारतीय मानक ब्युरोने (BIS) सोने आणि चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सुधारित शुल्क तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहे.(BIS hallmarking charges)
https://www.prahaar.in/2026/09/16/rampage-by-inmates-at-kalamba-jail-six-individuals-attacked-a-senior-officer-who-was-trying-to-quell-the-disturbance-causing-injury-to-his-arm-due-to-stone-pelting/
सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात ६७ टक्क्यांची वाढ
बिआयएसने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग शुल्क प्रति वस्तू ४५ रुपयांवरून वाढवून थेट ७५ रुपये केले आहे. म्हणजेच या शुल्कात सुमारे ६७ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. १४ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या ‘बिआयएस (हॉलमार्किंग) सुधारणा विनियम, २०२६’ च्या माध्यमातून ही दरवाढ अधिसूचित करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, ज्वेलर्सना आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क मारण्यासाठी प्रति वस्तू ७५ रुपये शुल्क द्यावे लागेल. तसेच, एका खेपेसाठी किमान शुल्क २०० रुपये असणार आहे.(BIS hallmarking charges)
दुसरीकडे, चांदीच्या दागिन्यांसाठीचे शुल्क प्रति वस्तू ३५ रुपये इतकेच कायम ठेवण्यात आले असून, चांदीच्या एका खेपेसाठी किमान शुल्क १५० रुपये आकारले जाईल.
आभूषण उद्योगाकडून चिंता व्यक्त; निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी
कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय आणि उद्योगाशी चर्चा न करता शुल्कात एकदम ६७ टक्क्यांची वाढ केल्याबद्दल आभूषण (ज्वेलरी) उद्योगाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने केंद्र सरकार आणि बिआयएसकडे या शुल्कवाढीचा तातडीने आढावा घेण्याची मागणी केली आहे. संबंधित घटकांशी चर्चा होईपर्यंत सध्याचे जुनेच शुल्क कायम ठेवावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. अनिवार्य अनुपालनाच्या खर्चात झालेली ही वाढ ग्राहकांच्या खिशावर आणि दागिन्यांच्या किमतींवर ताण आणणारी ठरू शकते.(BIS hallmarking charges)
https://www.prahaar.in/2026/09/16/goal-to-take-maharashtras-economy-to-1-trillion-driven-by-innovation-chief-minister-devendra-fadnavis/
हॉलमार्किंग म्हणजे काय?
बिआयएस हॉलमार्किंगद्वारे दागिन्यांमध्ये वापरण्यात आलेल्या मौल्यवान धातूच्या शुद्धतेची खात्री केली जाते. भारतीय मानक ब्युरोअंतर्गत प्रमाणित दागिन्यांवर प्रामुख्याने खालील तीन चिन्हे असतात:
- बिआयएसचा लोगो (चिन्ह)
- कॅरेट म्हणजेच मिलिसिमल फायनेस
- सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड (HUID – हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन)