Home ब्रेकिंग न्यूज Nitesh Rane : गडचिरोलीच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा; सेमान्यात उभारणार अत्याधुनिक मत्स्यालय, नितेश राणेंचे निर्देश

Nitesh Rane : गडचिरोलीच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा; सेमान्यात उभारणार अत्याधुनिक मत्स्यालय, नितेश राणेंचे निर्देश

0
Nitesh Rane : गडचिरोलीच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा; सेमान्यात उभारणार अत्याधुनिक मत्स्यालय, नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाची उभारणी अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पद्धतीने करावी. पारंपरिक स्वरूपाचे मत्स्यालय न उभारता पर्यटकांना वेगळा अनुभव देणारी संकल्पना राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळणार असल्याने कामाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Nitesh Rane)

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सेमाना येथे प्रस्तावित मत्स्यालयाच्या उभारणीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी प्रकल्पाच्या आराखड्याचे आणि संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. (Nitesh Rane)

https://www.prahaar.in/2026/09/16/minister-nitesh-rane-directs-immediate-action-to-expedite-stalled-projects-in-sindhudurg/

८८ हून अधिक प्रजातींचे शोभिवंत मासे

सेमाना येथे सुमारे एक ते सव्वा एकर जागेवर हे मत्स्यालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. येथे सुमारे ५४ अॅक्रेलिक टाक्या उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ८८ पेक्षा अधिक प्रजातींचे गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे ठेवण्यात येणार आहेत. आर. आर. मत्स्यालय सल्लागार संस्थेने विविध प्रजातींच्या गोड्या पाण्यातील माशांवर आधारित प्रकल्पाची संकल्पना बैठकीत सादर केली. (Nitesh Rane)

पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा उभारण्यावर भर

गडचिरोलीतील नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे मत्स्यालय आणखी एक आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनासह जिल्ह्याच्या पर्यटनविकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

https://www.prahaar.in/2026/09/16/rojgar-mahakumbh-maharashtra-gets-a-boost-mou-signed-between-maharashtra-state-skill-development-society-and-srujan-trust/

मत्स्यालयाचे बाह्य आणि अंतर्गत स्वरूप, माशांच्या टाक्यांची रचना तसेच पर्यटकांसाठीच्या सुविधा आधुनिक आणि आकर्षक असाव्यात, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांनी आवश्यक समन्वय साधून पुढील कार्यवाही वेगाने करावी. वन विभागाशी संबंधित बाबींवर वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले. (Nitesh Rane)

बैठकीस गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Nitesh Rane)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here