Home ब्रेकिंग न्यूज Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली, पोलिस मुंबईच्या वेशीवरच अडवणार?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली, पोलिस मुंबईच्या वेशीवरच अडवणार?

0
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली, पोलिस मुंबईच्या वेशीवरच अडवणार?
Permission for Manoj Jaranges protest denied for the third time likelihood of police stopping him at Mumbais outskirts

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता मुंबईच्या वेशीवरच रोखले जाण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. सलग दोन वेळा परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही जरांगे मुंबईकडे निघाले असून, दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार न घेतल्याने प्रकृती खालावली आहे. (Mumbai News)

मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा उत्साह असून, दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले आहेत. मुंबईतील मानाचे गणपती तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, जरांगे यांच्या आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने आंदोलनासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. (Manoj Jarange Patil News)

https://www.prahaar.in/2026/09/15/state-government-accepts-12-of-manoj-jaranges-13-demands/

मुंबई पोलिसांनी यापूर्वीही दोन वेळा जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आता तिसऱ्यांदा परवानगी नाकारण्यात आल्याने जरांगे यांचा ताफा मुंबईच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वीच रोखला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत अटी व शर्तींच्या अधीन राहून आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी दिली जाते. त्यामुळे परवानगीशिवाय आंदोलन करण्याचा किंवा वेगळ्या मार्गाने मुंबईत प्रवेश करून आंदोलन उभारण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. (Manoj Jarange Patil Hunger Strike News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here