Home ब्रेकिंग न्यूज Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

0
Ganpati Idol News: दीड दिवसाच्या गणपतीला आज निरोप, ढोल ताशाच्या गजरात साश्रुनयनांनी गणेश मुर्तींचे विसर्जन

मुंबई: “गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात साश्रुनयनांनी मुंबई आणि शहरामध्ये गणेशभक्तांकडून दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबई आणि शहरामध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत २८८९ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाला मंगळवारी दुपारपासून सुरुवात झाली आहे. या आकड्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीड दिवसांचे सार्वजनिक मंडळांच्या २५ गणेश मुर्ती, घरगुती गणेश मुर्ती २८३४ आणि हरतालिकेच्या ३० मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले आहे. गणेशमुर्ती विसर्जनासाठी महानगर पालिकेकडून प्रत्येक वॉर्डामध्ये कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. आपल्या सोयीप्रमाणे गणेश मुर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन बीएमसीकडून नागरिकांना करण्यात आले आहे. प्राप्त झालेला हा आकडा सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा आहे. यामध्ये वेळेप्रमाणे आणखीन वाढ होईल.

https://www.prahaar.in/2026/09/15/lalbaugcha-raja-media-stopped-despite-passes/

दरम्यान, जे गणेशभक्त मुंबईमध्ये नैसर्गिक ठिकाणी गणेशमुर्तीचे विसर्जन करणार आहेत, त्यांच्यासाठीही नियमावली देण्यात आली. अरबी समुद्राला येणारी भरती आणि ओहटी बघूनच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन बीएमसीने गणेशोत्सव मंडळांना केले आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर समुद्रामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येते. ओहोटीच्या वेळी लहान गणेश मूर्तीचे विसर्जन करणे सोयीचे असते. मात्र मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन समुद्राला भरती असताना करणे आवश्यक आहे. पण समुद्राला मोठे उधाण असताना गणेश विसर्जन करणे धोक्याचे असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे विसर्जनासाठी भरती आणि ओहोटीच्या वेळा प्रत्येक गणेशभक्तांना माहित असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here