मुंबई : गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील अंबानी कुटुंबाच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी यंदाही गणरायाचे भव्य स्वागत करण्यात आले. ‘अँटिलिया चा राजा’च्या आगमनावेळी संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक वातावरणाने उजळून निघाला. या सोहळ्यात अंबानी कुटुंबातील सदस्यांसह राधिका मर्चंट यांच्या नृत्याने विशेष लक्ष वेधून घेतले. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी, म्हणजे १३ सप्टेंबर रोजी, अंबानी कुटुंबाने आपल्या निवासस्थानी गणरायाचे स्वागत केले. नीता अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक रोषणाईमुळे अँटिलियातील वातावरण भक्तिमय झाले होते.(Radhika Ambani dance)
https://www.prahaar.in/2026/09/15/horrific-accident-in-chhatrapati-sambhajinagar-two-ganesh-devotees-killed-and-12-injured-after-a-container-truck-plowed-into-a-ganpati-procession/
View this post on Instagram
राधिकाच्या नृत्याची सोशल मीडियावर चर्चा
या उत्सवातील राधिका मर्चंट यांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राधिकाने भगवान गणेशाला समर्पित ‘एकदंताय वक्रतुंडाय’ या भक्तिगीतावर शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्यातील हावभाव आणि भक्तिभावाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विविध माध्यमांनीही या नृत्याची दखल घेतली आहे. राधिका मर्चंट या भरतनाट्यमच्या प्रशिक्षित नृत्यांगना आहेत. गणेशोत्सवाच्या या विशेष प्रसंगी त्यांनी पारंपरिक भारतीय पोशाखात नृत्य सादर केले. त्यांचा पोशाखही चर्चेचा विषय ठरला. उपलब्ध वृत्तांनुसार त्यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी तयार केलेला गुलाबी रंगाचा कांजीवरम सिल्क पोशाख परिधान केला होता. त्यावर पारंपरिक दागिन्यांची जोड देण्यात आली होती.(Radhika Ambani dance)
https://www.prahaar.in/2026/09/15/woman-brutally-beaten-following-a-dispute-in-vasai-police-register-a-case/
अँटिलियाची आकर्षक सजावट
यंदाच्या गणेशोत्सवासाठी अँटिलियाची सजावटही विशेष करण्यात आली होती. हजारो उबदार रंगांच्या दिव्यांची रोषणाई, झेंडू आणि इतर फुलांची सजावट, पारंपरिक दिवे आणि फुलांच्या कमानींनी संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. गणरायाची मूर्ती आकर्षक सुवर्ण पार्श्वभूमीवर विराजमान करण्यात आली होती. अंबानी कुटुंबाच्या या भव्य गणेशोत्सवाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली. त्यामुळे ‘अँटिलिया चा राजा’चा सोहळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.(Radhika Ambani dance)
दरम्यान, राधिकाच्या भक्तिमय नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, तिच्या पारंपरिक अंदाजासोबतच नृत्यातील भावमुद्रांचेही कौतुक होत आहे