Home क्रीडा IND vs AFG : अभिषेक शर्माचा तुफान जलवा; अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव कोलमडला, भारताचा ७ विकेट्सनी विजय

IND vs AFG : अभिषेक शर्माचा तुफान जलवा; अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव कोलमडला, भारताचा ७ विकेट्सनी विजय

0
IND vs AFG : अभिषेक शर्माचा तुफान जलवा; अर्शदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचा डाव कोलमडला, भारताचा ७ विकेट्सनी विजय
India wins by 7 wickets

नवी दिल्ली : अभिषेक शर्माच्या वादळी अर्धशतकानंतर अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सनी पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने १५७ धावांचे लक्ष्य अवघ्या १३.४ षटकांत तीन विकेट्स गमावून गाठले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.(India vs Afghanistan T20)

https://www.prahaar.in/2026/09/13/friendship-via-tinder-dating-app-two-sisters-harassed-by-two-young-men-after-meeting-through-an-online-connection/

अर्शदीपचा अचूक मारा; अफगाणिस्तान १५६ धावांवर

भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात रहमानुल्लाह गुरबाजला बाद करत भारताला सुरुवात करून दिली. त्यानंतर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. अफगाणिस्तानची अवस्था एका टप्प्यावर ४३ धावांत ५ विकेट्स अशी झाली होती. मात्र अझमतुल्लाह ओमरझाईने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला. त्याने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. मोहम्मद नबीने ३३ धावांची खेळी करत ओमरझाईला चांगली साथ दिली. दोघांनी ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र अर्शदीपने नबीला बाद करत ही जोडी फोडली. अखेरीस अफगाणिस्तानने २० षटकांत ८ बाद १५६ धावा केल्या. अर्शदीपने १९ धावा देत तीन विकेट्स घेतल्या.(India vs Afghanistan T20)

https://www.prahaar.in/2026/09/13/england-beat-pakistan-3-0-england-remain-in-sixth-place-while-pakistan-stay-at-the-bottom-in-ninth/

अभिषेक शर्माची वादळी फलंदाजी

१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच संजू सॅमसनच्या रूपाने धक्का बसला. सॅमसन १० धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. अभिषेकने अवघ्या ३२ चेंडूत ८२ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत सात चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने केवळ २२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. इशान किशननेही ३३ चेंडूत ४२ धावांची संयमी खेळी करत अभिषेकला साथ दिली. दोघांनी मिळून १२१ धावांची भागीदारी करत भारताचा विजय जवळपास निश्चित केला. अभिषेक आणि इशान बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्माने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने १३.४ षटकांत १५७/३ अशी मजल मारत सामना सात विकेट्सनी जिंकला. अभिषेक शर्माला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.(India vs Afghanistan T20)

या विजयामुळे भारताने मालिकेत आघाडी घेतली असून दुसरा टी-२० सामना १५ सप्टेंबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे. आता मालिकेत विजयी आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.(India vs Afghanistan T20)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here