मुंबई: पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने सोशल मीडियावरुन चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी माहिरा खान आई होणार आहे. तिने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडच्या किंग खान अर्थात शाहरूख खानसोबत तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. शाहरूख आणि माहिराने ‘रईस’ चित्रपटामध्ये एकत्रित काम केलं होतं. तिचा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे.
https://www.prahaar.in/2026/09/13/kbc-18-amitabh-bachchan-regrets-never-learning-music-says-he-still-wishes-to-learn-at-84/
माहिराने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर बेबी बंप असलेला फोटो शेअर केला. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने व्हाईट कलरचा गाऊन वेअर केलेला दिसत आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांना ‘गुड न्यूज’ देताना “आपण काही प्लॅन बनवतो आणि अल्लाहचे काही प्लॅन असतात.” असं कॅप्शन दिला आहे. अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अभिनेत्रीने २०२३ साली उद्योजक सलीम करीमसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर ते पहिल्यांदाच आई- बाबा होणार आहेत.
Congratulations Mahira🥺
MashAllah🤗🤗#MahiraKhan pic.twitter.com/pWLOJzDje4— rohti kyu?💀💀 (@lalalalaateun) September 13, 2026
माहिराने पहिले लग्न २००७ साली अली असकारी यांच्याबरोबर केले होते. त्यांना अजलान नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण २०१५ मध्ये, दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. माहिरा खान पाकिस्तान सोबतच भारतातही लोकप्रिय आहे. तिचा दोन्हीही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. तिने २०११ मध्ये ‘बोल’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. २०१७ साली माहिराने शाहरुख खानसोबत ‘रईस’ चित्रपटामध्ये काम केलं होतं. तिने ‘ॲक्टर इन लॉ’, ‘7 दिन मोहब्बत इन’, ‘बिन रोये’, ‘मंटो’, ‘सुपरस्टार’, ‘द लीजेंड ऑफ मौला जट’, ‘निलोफर’, ‘लव्ह गुरू’ आणि ‘आग लगे बस्ती में’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती आता ‘मिर्झा जट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/13/why-did-hanuman-ansh-miss-the-oscar-race-producers-reveal-the-details-the-dream-was-shattered-despite-their-best-efforts/