Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Coastal Road : जानेवारी २०२९मध्ये मुंबईकरांना विस्तारीत कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार

Mumbai Coastal Road : जानेवारी २०२९मध्ये मुंबईकरांना विस्तारीत कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार

0
Mumbai Coastal Road : जानेवारी २०२९मध्ये मुंबईकरांना विस्तारीत कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार

डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प काम पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्‍यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्‍ता (उत्‍तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्‍प हाती घेतला आहे. हा मेगा प्रकल्‍प आंतरबदल व जोडरस्‍त्‍यासह सुमारे ६० किलोमीटरचा असून वेसावे – भाईंदर ही नगरे किनारा रस्‍त्‍याने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर – भाईंदर जोड रस्‍ता अशा एकूण सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यामुळे नियोजित वेळेत याची उभारणी झाल्यास जानेवारी २०२९मध्ये मुंबईकरांचा उपनगरातील प्रवास सुसह्य होणार आहे. (Mumbai Coastal Road)

https://www.prahaar.in/2026/09/13/nitesh-rane-need-to-send-those-challenging-the-freedom-of-religion-act-to-pakistan/

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी दहिसर – भाईंदर जोड रस्‍ता (पॅकेज ७) अंतर्गत मिरा – भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर आंतरबदल या प्रकल्‍पस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. दहिसर – भाईंदर जोड रस्‍ता हा मुंबई आणि मिरा- भाईंदर परिसरातील महत्त्वाचा प्रकल्प असून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम यांच्यात थेट आणि जलद रस्ते संपर्क निर्माण होणार आहे. या रस्‍ते प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ५.१३५ किलोमीटर आहे. त्‍यात उन्नत मार्ग , खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्‍ता , खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमीन क्षेत्रावरील उन्‍नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग व आंतरबदल आणि उड्डाणपूल आदी विविध प्रकारच्या अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे. (Mumbai Coastal Road)

https://www.prahaar.in/2026/09/13/eknath-shinde-receives-a-grand-welcome-in-mumbai-upon-his-return-from-london-honoured-with-three-awards-shiv-sainiks-celebrate-enthusiastically-at-the-airport/

दहिसर – भाईंदर जोड रस्‍ता प्रकल्‍पातील सुमारे ३.८३ किलोमीटर लांबीचा व ४५ मीटर रूंदीचा मुख्‍य उन्नत रस्‍ता हा मुंबई किनारा रस्‍त्‍याचा (उत्‍तर) अंतिम भाग आहे. या कार्यस्थळास बांगर यांनी भेट दिली व प्रारंभिक कामांची माहिती घेतली. सद्यस्थितीत गॅबियन भिंतीचे कुंपण काम सुरू आहे. तसेच, पुलाच्या पायाभरणीसाठी पाइल्स (खोल पाया) आणि त्यावर पाइल कॅप तयार करण्यात येत आहे. ६० पायाभूत खांब , ५ पाइल कॅप , पुलाचे ४ आधारस्तंभ , आधारस्तंभाचा शीर्षभाग , पुलाचा बांधकाम भाग ९ आदी कामे पूर्ण झाली आहेत. कार्यस्थळी अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध असून तात्पुरते प्रवेश पूल यंत्रणा कार्यान्वित आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग गर्डरचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी घेतली. (Mumbai Coastal Road)

प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. त्यासाठी प्राधान्य क्रम निश्चित करावा. विविध प्राधिकरणांसह मिरा – भाईंदर महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे. सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यप्रणालीचे अत्यंत काळजीने पालन करावे. कामे सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यस्थळी बॅरिकेडिंग करावे, कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत. हे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले. याप्रसंगी उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता (मुंबई किनारा रस्ता- उत्तर) वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते, सल्‍लागार यावेळी उपस्थित होते. (Mumbai Coastal Road)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here