मुंबई : लंडन दौऱ्यात लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविले गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यानंतर शिवसैनिक आणि समर्थकांनी विमानतळावर जोरदार स्वागत केले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिंदे दाखल झाले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. (Eknath Shinde)
तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यात मिळालेले हे पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचा गौरव असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. “हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान आहे,” असे ते म्हणाले. (Eknath Shinde)
https://www.prahaar.in/2026/09/13/rajapur-accident-vehicle-heading-to-konkan-for-ganesh-festival-meets-with-a-severe-accident-in-rajapur-10-injured/
लंडनमधील भारतीय आणि मराठी समाजाने केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने आपण भारावून गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. परदेशात राहूनही मराठी माणूस भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेले नाते जपतो, याचा अनुभव या दौऱ्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
लंडनमधील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि हेरिटेज वास्तूंचा अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे शिंदे म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. (Eknath Shinde)
https://www.prahaar.in/2026/09/13/commuting-for-mumbaikars-set-to-get-a-major-boost-work-on-the-dahisar-bhayandar-coastal-route-is-progressing-rapidly-a-45-minute-journey-will-be-cut-down-to-15-minutes/
दौऱ्यात क्रिकेटपटू विराट कोहली यांची भेट झाल्याचे सांगताना शिंदे यांनी त्यांच्या साधेपणाचे आणि नम्रतेचे कौतुक केले. तसेच परदेशातही महाराष्ट्राची संस्कृती जपली जात असल्याचे सांगताना लंडनमध्ये वडापावचा आस्वाद घेतल्याची मिश्कील आठवणही त्यांनी सांगितली. (Eknath Shinde)
शिंदे यांच्या स्वागतासाठी आमदार प्रकाश सुर्वे, तुकाराम काते, मुरजी पटेल यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Eknath Shinde)