Home ब्रेकिंग न्यूज OYO Hotel : OYO आणि लॉज चालकांनो सावधान! नियम मोडला तर थेट जेलची हवा; पोलिसांनी जारी केले नवे आदेश

OYO Hotel : OYO आणि लॉज चालकांनो सावधान! नियम मोडला तर थेट जेलची हवा; पोलिसांनी जारी केले नवे आदेश

0
OYO Hotel : OYO आणि लॉज चालकांनो सावधान! नियम मोडला तर थेट जेलची हवा; पोलिसांनी जारी केले नवे आदेश

नागपूर : नागपूरमध्ये OYO हॉटेल, लॉज आणि इतर हॉटेल चालकांसाठी पोलिसांनी कडक नियमावली लागू केली आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे आणि त्यांची ओळख तपासणे आता आवश्यक असणार आहे. हॉटेलमध्ये कमी वेळासाठी रूम घेण्याची सुविधा असल्याने अनेक जोडपी आणि प्रेमीयुगुलांकडून अशा ठिकाणांचा वापर केला जातो. मात्र, काही हॉटेलमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमांनुसार OYO, लॉज, हॉटेल किंवा घरगुती निवासाच्या ठिकाणी रूम देताना ग्राहकाची ओळख तपासावी लागणार आहे. ग्राहकाचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यांसारखे वैध ओळखपत्र पाहून त्याची नोंद करावी लागेल. यासोबतच ग्राहकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि वयाची माहिती रजिस्टरमध्ये ठेवावी लागणार आहे. अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये रूम देण्यास मनाई करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/12/peace-and-stability-along-the-border-are-the-primary-prerequisite-for-bilateral-relations-prime-minister-modis-clear-message-during-discussions-with-chinese-president-xi-jinping/

हॉटेलच्या प्रवेशद्वारासह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेही आवश्यक करण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये हॉटेलमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यक्तींचा चेहरा स्पष्टपणे रेकॉर्ड होईल, याची काळजी घ्यावी लागणार आहे. या कॅमेऱ्यांचे फुटेज किमान 90 दिवस सुरक्षित ठेवावे लागेल. पोलिसांना तपासासाठी फुटेजची आवश्यकता असल्यास हॉटेल चालकांना ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि वेटर यांचीही योग्य माहिती ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांच्या रहिवासी पुराव्यासह आवश्यक कागदपत्रांची नोंद हॉटेल व्यवस्थापनाला ठेवावी लागणार आहे.

मानवी तस्करी, बेकायदेशीर देहविक्री आणि फसवणुकीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ही नियमावली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या निर्देशानुसार हॉटेल चालकांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here