Home ब्रेकिंग न्यूज Shiv Sena Express : ‘शिवसेना एक्सप्रेस’ला आमदार निलेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

Shiv Sena Express : ‘शिवसेना एक्सप्रेस’ला आमदार निलेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

0
Shiv Sena Express : ‘शिवसेना एक्सप्रेस’ला आमदार निलेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून नियोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीला शनिवारी दादर रेल्वे स्थानकातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. दादर ते कुडाळ धावणाऱ्या या विशेष रेल्वेगाडीने गणेशभक्तांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत कोकणच्या दिशेने प्रस्थान केले. (Shiv Sena Express)

https://www.prahaar.in/2026/09/12/dr-manisha-jejurkar-case-high-court-observations-add-a-twist-to-the-case-nilesh-jejurkars-anticipatory-bail-plea-rejected/

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण असून, या काळात मुंबई आणि ठाण्यात वास्तव्यास असलेले कोकणवासी मोठ्या संख्येने आपल्या गावी जातात. रेल्वे आणि बसगाड्यांना होणारी गर्दी, तिकिटांची धावपळ आणि प्रवासाचा खर्च या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी दरवर्षी ‘शिवसेना एक्सप्रेस’ची व्यवस्था केली जाते. या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे ७५ ते ८० हजार कोकणवासीयांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. (Shiv Sena Express)

https://www.prahaar.in/2026/09/12/nashik-e-bus-a-new-era-begins-with-eco-friendly-e-buses-regular-e-bus-service-to-commence-on-tuesday/

‘शिवसेना एक्स्प्रेस’चा उपक्रम कर्तव्य म्हणून सुरू ठेवणार

– यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार निलेश राणे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना त्यांच्या घराकडे पाठविण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत. कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव असून, मुंबई आणि ठाण्यात राहणाऱ्या कोकणवासीयांनी आपल्या गावी जाऊन हा सण साजरा करावा, यासाठी हा उपक्रम सुरू ठेवला आहे.
– गेल्या काही वर्षांत आतापर्यंत जवळपास ७५ ते ८० हजार कोकणवासीयांना त्यांच्या घराकडे पाठविण्याची सोय करण्यात आली आहे. हा कोणताही मोठा पराक्रम नसून, गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांनी आपल्या गावी जावे, ही इच्छा आणि आमचे कर्तव्य म्हणून हा उपक्रम राबवित आहोत.
– मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी विषयी विचारले असता निलेश राणे म्हणाले, महामार्ग क्रमांक ६६ वर माणगावचा टप्पा बॉटलनेक ठरत आहे. या महामार्गावर आता दोनच बॉटलनेक शिल्लक राहिले असून, सध्या वाहतूक कोंडीचा एक प्रमुख टप्पा म्हणून माणगाव दिसत आहे. मात्र पुढील काही दिवसात हा रस्ता सुरळीत झालेला दिसून येईल. (Shiv Sena Express)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here