Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

0
Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेट्रो वनची सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत शेवटची मेट्रो रात्री १.०३ वाजेपर्यंत वर्सोवा स्थानकावर पोहोचणार आहे. (Mumbai Metro)

https://www.prahaar.in/2026/09/11/devotion-is-more-important-than-the-size-of-the-idol/

शेवटच्या मेट्रोची वेळ काय असेल?

मुंबई मेट्रो वनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्सवाच्या कालावधीत शेवटच्या फेऱ्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे.

वर्सोवा ते घाटकोपर : रात्री १२.१५ वाजता शेवटची ट्रेन
घाटकोपर ते वर्सोवा : रात्री १२.४० वाजता शेवटची ट्रेन
घाटकोपरहून सुटणारी शेवटची ट्रेन : रात्री १.०३ वाजता वर्सोवा येथे पोहोचणार

गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या काळात मुंबईतील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे उत्सवासाठी बाहेर पडणाऱ्या तसेच रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Metro)

https://www.prahaar.in/2026/09/11/major-relief-from-railways-for-ganeshotsav-386-ganpati-special-trains-announced-with-4-additional-trains-added-for-the-konkan-region/

मुंबई मेट्रो वनकडून उत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना या विशेष वेळापत्रकाचा लाभ घेता येणार आहे. (Mumbai Metro)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here