Home ब्रेकिंग न्यूज BJP on Thackeray brothers : महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभेही राहिले नाहीत; लालबागमधील व्हिडिओवरून भाजप आक्रमक

BJP on Thackeray brothers : महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभेही राहिले नाहीत; लालबागमधील व्हिडिओवरून भाजप आक्रमक

0
BJP on Thackeray brothers : महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभेही राहिले नाहीत; लालबागमधील व्हिडिओवरून भाजप आक्रमक
Navnath Ban launches a scathing attack on the Thackeray brothers.

मुंबई: लालबाग येथील एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र गीत सुरू असताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही जागेवर उभे राहिले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेवर भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.(BJP on Thackeray brothers)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://www.prahaar.in/2026/09/11/major-shake-up-in-the-nashik-voter-list-names-of-10-lakh-27-thousand-voters-removed/

भाजपचे ठाकरे बंधूंवर जोरदार टीकास्त्र या मुद्द्यावरून भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “मराठी माणसाच्या नावाने राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्राचाच अपमान करायचा, हीच ठाकरे बंधूंची नवी कार्यपद्धती आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.(BJP on Thackeray brothers)

https://www.prahaar.in/2026/09/11/simhastha-kumbh-mela-no-entry-for-private-vehicles-during-the-auspicious-amrut-parvani-at-the-simhastha-kumbh-mela/

पुढे बोलताना नवनाथ बन म्हणाले, “राज्यगीत सुरू असताना साधे एकाजागी उभे राहण्याचे भानही राहू नये? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांकडूनच जर राज्यगीताचा असा अवमान होत असेल, तर हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अपमान नाही का? मराठी माणूस, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेचा ठेका घेत फिरणाऱ्यांनी आधी राज्यगीताचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान कसा करायचा, हे शिकले पाहिजे.” आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचे मराठी आणि महाराष्ट्र प्रेम केवळ राजकारणासाठीच असल्याचा दावा याद्वारे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.(BJP on Thackeray brothers)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here