Home Uncategorized Ganeshotsav Decoration 2026: वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भव्य दिव्य देखाव्याने जिंकले मन

Ganeshotsav Decoration 2026: वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भव्य दिव्य देखाव्याने जिंकले मन

0
Ganeshotsav Decoration 2026: वांद्रे येथे साकारलेय प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती, भव्य दिव्य देखाव्याने जिंकले मन
bandra west public ganeshotsav decoration famous gujrat somnath temple has been created its magnificent and spectacular display has won hearts

मुंबई: मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळे दरवर्षी ऐतिहासिक आणि आकर्षक मंदिरांची प्रतिकृती साकरतात. त्यापैकी एक म्हणजेच, वांद्रा पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गुजरातमधील प्रसिद्ध श्री सोमनाथ मंदिराची भव्य आरास साकारली आहे. सोमनाथ मंदिराची भव्य दिव्य आरास सहाजिकच गणेशभक्तांचे डोळे दिपवून टाकणार आहे. ही प्रतिकृती मंडळाचे संस्थापक आणि सल्लागार तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/11/ganesh-mandals-organize-a-special-maha-aarti-to-mark-prime-minister-narendra-modis-birthday/

दरवर्षी प्रमाणे मंडळाने यंदाही देशातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक वारशाची ओळख मुंबईकरांना करून देण्याचं काम केले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना देशातील ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यवैभवाची माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली. दरम्यान, गणेश मंडळाने गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाच्या आरासीतून देशातील विविध प्रसिद्ध देवस्थानांची ओळख मुंबईकरांना करून दिली आहे. यापूर्वी मंडळाने शिर्डीचे साई मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, केदारनाथ मंदिर तसेच गोव्यातील श्री शांतादुर्गा मंदिर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारल्या होत्या.

https://www.prahaar.in/2026/09/10/major-relief-for-konkan-and-ganeshotsav-4-additional-ganpati-special-trains-to-run-between-mumbai-and-kolhapur/

मंडळाच्या या उपक्रमाला दरवर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म, इतिहास आणि स्थापत्यकलेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. यंदाच्या गणेशोत्सवातून मंडळ भाविकांना सोमनाथ मंदिराचा इतिहास, भगवान शिवाविषयीची श्रद्धा आणि मंदिराचे स्थापत्यवैभव यांची माहिती देणार आहे. धार्मिक स्थळांकडे केवळ श्रद्धेच्या दृष्टीने न पाहता त्यामागील इतिहास, कला, स्थापत्य आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेण्याचा संदेशही या आरासीतून दिला जाणार आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/11/immediately-transfer-those-who-have-been-working-in-the-same-post-for-10-to-12-years/

गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील प्रभास पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते.या ऐतिहासिक मंदिराची रचना, शिखर, सभामंडप, कोरीवकाम आणि परिसराचे सौंदर्य यांचा बारकाईने अभ्यास करून गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना मुंबईतच सोमनाथ मंदिराच्या स्थापत्यवैभवाची अनुभूती घेता येणार आहे. तसेच या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली रोषणाई हेही दरवर्षी प्रमाणे तरुणांचे आकर्षक ठरेल, अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here