Home महाराष्ट्र नाशिक Nashik News : एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित ! ‘ही’ चूक भोवली

Nashik News : एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित ! ‘ही’ चूक भोवली

0
Nashik News : एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित ! ‘ही’ चूक भोवली

Igatpuri News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फेरफार नोंदीत अनियमितता उघडकीस आल्याने एकाच झटक्यात 3 तलाठी निलंबित करण्यात आले आहे. फेरफार नोंदींच्या कामकाजातील अनियमिततेवर थेट कारवाई झाल्याने इगतपुरी तालुक्यातील महसूल विभागात (Revenue Department) एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रशासनाकडून अधिक काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गावनिहाय महसूल फेरफार नोंदी हाताळताना झालेल्या अनियमिततेची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. इगतपुरी तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या दफ्तरांची तपासणी करण्यात आली. प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणीदरम्यान मुकणे, वाडीवऱ्हे, मुंढेगाव, सांजेगाव आणि गोंदे दुमाला येथील महसूल कामकाजात विविध अनियमितता आढळून आल्या. फेरफार नोंदी करताना संबंधितांना आवश्यक नोटिसा न बजावता कार्यवाही पूर्ण करणे, अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन फेरफार नोंदी घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी न करणे, तसेच खातेदार आणि हितसंबंधित व्यक्तींना नोटीस न देता फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, अशा गंभीर त्रुटी तपासणीत निदर्शनास आल्या.

https://www.prahaar.in/2026/09/11/crime-news-returned-home-after-a-month-and-murdered-his-wife-husband-absconds-with-two-young-children/

कारवाई झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी एका तलाठ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित दोन तलाठ्यांसह मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांची प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बबन कोकाटे – मंडळ अधिकारी, वाडीवऱ्हे नितीन केदार – तलाठी, वाडीवऱ्हे सोमनाथ सांगळे – तलाठी, गोंदे दुमाला समीक्षा देव – तलाठी, सांजेगाव मनोज वाकदकर- तलाठी, मुंढेगाव पुष्कराज निकम – तलाठी, मुकणे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार कार्यालयातील दफ्तराचीही अचानक तपासणी होणार असल्याने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सतर्कता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here