Home ब्रेकिंग न्यूज Pune Ganeshotsav : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात ‘या’ दिवसांमध्ये दारूविक्री बंद, आदेश जारी

Pune Ganeshotsav : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात ‘या’ दिवसांमध्ये दारूविक्री बंद, आदेश जारी

0
Pune Ganeshotsav : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात ‘या’ दिवसांमध्ये दारूविक्री बंद, आदेश जारी

पुणे : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून, पुणे शहरात बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात मद्यविक्रीबाबत महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीनिमित्त पुणे शहरात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या मार्गांवरून गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका जाणार आहेत, त्या मार्गांवरील संबंधित परिसरातही मद्यविक्रीवर बंदी राहणार आहे.

https://www.prahaar.in/2026/09/11/immediately-transfer-those-who-have-been-working-in-the-same-post-for-10-to-12-years/

25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने प्रमुख विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय 26 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत संबंधित भागांमध्ये मद्यविक्री सुरू करता येणार नाही.

‘या’ भागात मद्यविक्री बंद

खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 26 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणुका पूर्ण होईपर्यंत या भागात मद्यविक्री करता येणार नाही.

या कालावधीत संबंधित परिसरातील दारूची दुकाने, बार आणि परमिट रूममध्ये मद्यविक्री बंद राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here