Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/10/a-khanjiri-in-hand-patriotism-in-the-heart-the-saga-of-rashtrasant-tukadoji-maharaj-is-now-coming-to-the-silver-screen/
गाड्यांचे वेळापत्रक आणि फेऱ्या:
-
गाडी क्रमांक ०१४१७ (विशेष गाडी): ही गाडी CSMT येथून १२ सप्टेंबर २०२६ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.२० वाजता कोल्हापूर येथे पोहोचेल. (एकूण २ सेवा)
-
गाडी क्रमांक ०१४१८ (विशेष गाडी): ही गाडी कोल्हापूर येथून १२ सप्टेंबर २०२६ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ००.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.३० वाजता CSMT येथे पोहोचेल. (एकूण २ सेवा)
https://www.prahaar.in/2026/09/10/pace-of-kunbi-certificate-distribution-picks-up-in-marathwada-over-3-16-lakh-certificates-distributed/
प्रमुख थांबे:
गाडीची डब्यांची रचना (कंपोझिशन):
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्यांमध्ये १ वातानुकूलित प्रथम वर्ग, २ वातानुकूलित द्वितीय वर्ग, ३ वातानुकूलित तृतीय वर्ग, ४ शयनयान (स्लीपर), ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार अशी एकूण १६ डब्यांची रचना असेल.
https://www.prahaar.in/2026/09/10/18276-kunbi-caste-certificates-distributed-in-jalna-district-district-collector-reports-99-9-of-applications-approved/
आरक्षण कधी आणि कुठे सुरू होणार?
गाडी क्रमांक ०१४१८ आणि ०१४१७ या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व PRS केंद्रांवर आणि IRCTC संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच, सामान्य दरासह अनारक्षित डब्यांचे तिकीट UTS प्रणालीद्वारे काढता येईल. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी ‘रेलवन’ (RailOne) ॲप देखील डाउनलोड करता येईल.
गाड्यांच्या थांब्यांच्या वेळेबद्दल सविस्तर माहितीसाठी नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम (NTES) ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.