मुंबई : वांद्रे पूर्व येथील गरीब नगरमधील एका अनधिकृत मशिदीच्या पाडकामानंतर मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे पाकिस्तानस्थित दहशतवादाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले असून, मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने (CIU) महाबळेश्वर येथून ३९ वर्षीय मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन याला अटक केली आहे.(Imtiaz Khatri Threat Case)
कुटुंबाची दहशतवादी पार्श्वभूमी
तपासामध्ये असे समोर आले आहे की, संशयित शफीकचे वडील आणि दोन मोठे भाऊ पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (PoK) मुझफ्फराबाद येथे राहतात. गुप्तचर विभाग (IB) या संशयास्पद संपर्कांची कसून चौकशी करत आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, शफीकचा एक भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता आणि तो प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘लश्कर-ए-तोयबा’ (LeT) सोबत जोडलेला असून तो कमांडर पदापर्यंत पोहोचल्याची शक्यता आहे.(Pakistan Connection)
https://www.prahaar.in/2026/09/10/nashik-finally-relief-regarding-the-saptashrungigad-road-closure-the-route-will-remain-open-on-this-day/
धमक्यांचे मूळ आणि तांत्रिक पुरावे
अनधिकृत मशिदीविरोधातील कारवाईला आणि नागरी प्रशासनाला पाठिंबा दिल्यामुळेच इम्तियाज खत्री यांना लक्ष्य करण्यात आले होते. खत्री यांनी २२ जून रोजी तक्रार दाखल केली होती, ज्यानुसार त्यांना २१ मे पासून सातत्याने धमक्या येत होत्या. पोलिसांनी शफीकच्या फोनमधून अनेक धमकीचे व्हॉट्सॲप मेसेज आणि व्हॉइस नोट्स जप्त केले आहेत. यामध्ये पाकिस्तानी व इतर आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरील संवादांचा समावेश आहे. आयपी ॲड्रेस आणि तांत्रिक विश्लेषणावरून हे क्रमांक पाकिस्तानस्थित इंटरनेट सेवा पुरवठादारांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Imtiaz Khatri Threat Case)
तांत्रिक तपास आणि डिजिटल एक्स्ट्रॅक्शन
शफीकच्या नावावर असलेल्या एका भारतीय क्रमांकाशी एक पाकिस्तानी नंबर सतत संपर्कात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी महाबळेश्वर गाठून त्याला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एक पॉकेट डायरी जप्त केली आहे. त्यातील एक फोन अलीकडेच फॉरमॅट करण्यात आल्याने, डिलीट झालेला डेटा रिकव्हर करण्यासाठी उपकरणे डिजिटल एक्स्ट्रॅक्शनसाठी पाठवण्यात आली आहेत.(Pakistan Connection)
https://www.prahaar.in/2026/09/10/pm-modi-chinas-xi-jinping-likely-to-hold-bilateral-meet-at-brics-first-after-2020-galwan-clashes/
‘फैयाज काश्मिरी’ आणि फेसबुक कनेक्शन
चौकशीदरम्यान शफीकने तो पाकिस्तानी नंबर ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या व्यक्तीचा असल्याचा दावा केला असून, फेसबुकच्या माध्यमातून आपली ओळख झाल्याचे त्याने सांगितले. तपास यंत्रणांना या क्रमांकाशी संबंधित “ब्लॅक गोल्ड” आणि “फैयाज काश्मिरी” अशा ऑनलाइन ओळखी आढळल्या आहेत. पोलीस या सर्व बाबींची सत्यता पडताळत आहेत.(Imtiaz Khatri Threat Case)
सध्या तपास अधिकारी शफीकची कौटुंबिक पार्श्वभूमी, नागरिकत्व, सीमेपार झालेला संवाद तसेच संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाली आहे का, या सर्व मुद्द्यांवरून कसून चौकशी करत आहेत.