Home गणेशोत्सव Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना

Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना

0
Pen ganpati idol : पेणच्या गणेशमूर्तींचा जगभरात डंका! यंदा ७० लाखांहून अधिक मूर्तींची विक्री; तब्बल २० लाख बाप्पा परदेशात रवाना
Pen ganpati idol

पेण : गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2026) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ‘मूर्तींचे माहेरघर’ मानल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील गणेशमूर्तींना देश-विदेशातून प्रचंड मागणी मिळाली आहे. यंदाच्या हंगामात पेणमधून सुमारे ७० लाखांपेक्षा जास्त गणेशमूर्तींची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, यातील तब्बल १५ ते २० लाख मूर्ती थेट परदेशांतील बाजारपेठेत पाठवण्यात आल्या आहेत. कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे यंदा गणेशमूर्तींच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र, असे असूनही जगभरातील गणेशभक्तांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून आली नाही आणि मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या. स्थानिक मूर्तिकार व विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा कापडाचा वापर करून तयार केलेल्या विशेष आकर्षक गणेशमूर्तींना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली.

अमेरिका, दुबई ते वेस्ट इंडिजपर्यंत पेणच्या बाप्पाची क्रेझ

पेणमध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्ती केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही, तर अमेरिका, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि वेस्ट इंडिज यांसारख्या विविध देशांमध्ये पाठवल्या जातात. परदेशातील निर्यातीची तयारी दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच सुरू होते आणि ती जूनपर्यंत चालते. त्यानंतर स्थानिक आणि देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यावर भर दिला जातो. अलिकडच्या वर्षांत थायलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया, इंडोनेशिया, मॉरिशस अशा अनेक देशांमध्ये पेणच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनिवासी भारतीयांनी (NRI) केलेल्या ऑनलाइन बुकिंगच्या आधारे यंदा सुमारे ५ लाख शाडूच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्ती पेणमधील कार्यशाळांमधून परदेशात रवाना करण्यात आल्या.

https://www.prahaar.in/2026/09/10/mmrda-directs-action-against-unauthorized-mosque-in-mumbai-airport-vicinity-kirit-somaiya-demands-registration-of-an-fir/

समुद्रमार्गे वाहतूक आणि ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींना मागणी

१४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी या सर्व मूर्ती ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी’ (JNPA) या बंदरामार्फत मार्च ते मे या कालावधीत जहाजांद्वारे विविध देशांत पाठवण्यात आल्या. पूर्वी परदेशातून प्रामुख्याने लहान आकाराच्या मूर्ती मागवल्या जायच्या; परंतु यंदा या ट्रेंडमध्ये मोठा बदल झाला असून १० इंचांपासून ते थेट ६ फुटांपर्यंतच्या मोठ्या मूर्तींची मागणी नोंदवण्यात आली. परदेशात राहणाऱ्या मराठी आणि भारतीय नागरिकांमुळे पेणच्या गणेशमूर्तींची लोकप्रियता जागतिक स्तरावर सातत्याने वाढत आहे.

आखाती देशांतील तणावामुळे निर्यातीत काही काळ अडथळा

यंदाच्या निर्यातीदरम्यान काही आंतरराष्ट्रीय आव्हानांचाही सामना करावा लागला. आखाती देशांमधील (Gulf Region) युद्धजन्य व तणावाच्या परिस्थितीमुळे JNPA बंदरामधून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीला काही काळ विलंब झाला होता. त्यामुळे मूर्ती वेळेवर पोहोचतील का, अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, काही दिवसांतच परिस्थिती निवळल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आणि लाखो गणेशमूर्ती सुरक्षितपणे परदेशांतील भक्तांपर्यंत पोहोचल्या.