Home ब्रेकिंग न्यूज Worli Century Mill : वरळीतील सेंच्युरी मिल, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड तसेच सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव मंजूर

Worli Century Mill : वरळीतील सेंच्युरी मिल, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड तसेच सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव मंजूर

0
Worli Century Mill : वरळीतील सेंच्युरी मिल, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड तसेच सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव मंजूर
BMC

महापालिका सभागृहात विरोधकांनी गोंधळ, महापौरांनी प्रस्तावांना दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची सेंच्युरी टेक्सटाइल अँड इंडस्ट्रीजची जागा, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जागा नवभारत कंपनीला धारावी विकास प्रकल्प कामांसाठी कास्टींग यार्ड करता आणि सेव्हन हिल्स हेल्थकेअर आणि कॅप्री ग्लोबल कंपनीसोबत संयुक्त करार करण्याच्या प्रस्तावांना सुधार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या तिन्ही प्रस्तावांना महापालिका सभागृहातही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सेंच्युरी मिलच्या प्रस्तावावर प्रशासनाने काही सुधारणा सूचवल्यानंतर महापौरांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. पण आपल्या बोलू न दिल्यामुळे विरोधकांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. या गोंधळात महापौरांनी प्रस्ताव पुकारत या प्रस्तावांना मंजुरी दिली. विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे सत्ताधाऱ्यांना हे प्रस्ताव मंजूर करताना कोणत्याही अडचणी आल्या नाही. (BMC)

https://www.prahaar.in/2026/09/09/the-municipal-corporation-house-in-mumbai-heated-up-over-the-water-issue/

मुंबई महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचना मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या कामकाजाला सुरुवात केले. यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय क्रमांकापासून सुधार समितीच्यावतीने मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले मुलुंड येथील घनकचरा व्यवस्थापन सुविधेचा आरक्षण रद्द करणे, के पश्चिम येथील आंबिवली येथील मंजूर रस्ता वगळून तेथील ले आऊटम रस्ता म्हणून दर्शवणे, सेव्हनहिल्स रुग्णालय चालवण्यास देण्याकरता, विलेपार्ले येथील सार्वजनिक सुविधा आरक्षण वगळून डायलेसीस सेंटर उभारणे, महापालिकेच्या भाडेकरु मालमत्तांच्या पुनर्विकासात एकवेळ अधिमुल्याची आकारणी करण्याचे धोरण, बोरीवलीतील गृहनिर्माण संस्थांकडून जमिनीच्या वाढलेल्या मुल्याची रक्कम वसूल करणे, सागरी किनारा रस्ता प्रकल्प अंतर्गत जमिनीचे संपादन, माटुंगा येथील भूखंडांचे एकत्रिकरण, आंबीवली येथील लक्ष्मीनारायण मंदिराचे आरक्षण बदले, सेंच्युरी मिलची जागा ३० अधिक ३० वर्षांकरता भाडेकरारावर देणे, वडाळा येथील पंचशील नगर येथील जलवाहिनी लगत असलेल्या झोपड्यांचा पुनर्विकास, जी दक्षिण येथील एसआरए प्रकल्पांतर्गत भूखंडांसोबत एकत्रिकरण करून पुनर्विकास करून एनओसी देणे, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडीच जागा भाडेकरारावर देणे आणि मुलुंडमधील जागा पेट्रोलपंपाचे आरक्षणाकरता देणे आदींचे प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आले. यासर्व प्रस्तावांना महापालिका सभागृहात विरोधकांनी केलेल्या गोंधळात मंजुरी देण्यात आली. ( Worli Century Mill)

दरम्यान हे प्रस्ताव मंजूर केल्याने अखेर विरोधी पक्षांनी तिथून सभात्याग करत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर विरोधी पक्षाने महापालिका सभागृहाबाहेरील व्हरांड्यात प्रति सभागृह भरवण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नगरसेवकांसह अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची भेट घेवून या प्रस्तावाच्या विरोधाबाबत निवेदन दिले.( Mumbai Municipal Corporation)

किशोर पेडणेकर यांनी महापौर बनण्याची हौस भागवून घेतली

या प्रति सभागृहामध्ये महापौर म्हणून विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भूमिका बजावली. महापौर पदावरुन उतरल्यानंतर किशोरी पेडणेकर यांना या प्रति सभागृहात महापौर म्हणून पद भूषवून आपली महापौर बनण्याची इच्छा पूर्ण केली. या प्रति सभागृहात कार्यक्रम पत्रिकेवरील मुख्य सभागृहात मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांचे वाचन करून हे प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्यात आले. ( BMC General Body Meeting)