Home महाराष्ट्र कोकण Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

0
Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक
Central Railway Ganpati 2026 Special Train

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी वाहन अशा वेगवेगळ्या माध्यमातून नोकरदार आपल्या गावी जात आहेत. अशातच मध्य रेल्वेने खास गणशोत्सवानिमित्त काही गणपती विशेष ट्रेन्सची घोषणा केली आहे. कोकण रेल्वेकडून दोन अनारक्षित मेमू ट्रेनची घोषणा करण्यात आली असून या ट्रेन्सच्या वेळापत्रक, फेऱ्या आणि त्यांच्या थांब्याबद्दल जाणून घेऊया… (Ganeshotsav 2026)

https://www.prahaar.in/2026/09/08/toll-waiver-for-ganesha-devotees-traveling-to-konkan-major-relief-from-the-government-toll-concessions-on-major-highways-including-the-atal-setu/

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून दोन विशेष अनारक्षित रेल्वे सेवा चालवल्या जाणार आहेत. कोकणात गावी जाताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चिपळूण- पनवेल अशा २ गाड्यांच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. जरीही प्रवाशांचं रेल्वेचं तिकिट कन्फर्म नसलं तरीही प्रवासी आरामात या एक्स्प्रेसने प्रवास करू शकणार आहेत. कोकणवासीयांचा एका अर्थी परतीचा प्रवास सुखकर होणार, हे नक्की. (Central Railway)

मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष रेल्वे १५ आणि १८ सप्टेंबर रोजी मडगाववरून दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. पुन्हा परत येताना ती रेल्वे १६ आणि १९ सप्टेंबर रोजी एलटीटीवरून सकाळी ७ वाजता सुटेल आणि रात्री ११:४५ च्या दरम्यान मडगाव स्थानकावर पोहचेल. ह्या एक्स्प्रेसचं बुकिंग करायचे झाल्यास ते आजपासून अर्थात ८ सप्टेंबरपासून प्रवाशांना करता येणार आहे. या एक्स्प्रेससोबत रेल्वे कडून आणखी एक विशेष मेमू लोकल चालवली जाणार आहे. (Kokan Railway)

https://www.prahaar.in/2026/09/08/investigate-the-%e2%82%b921-crore-repair-work-at-the-mahalakshmi-temple-demands-virendra-ichalkaranjikar/

दुपारच्या सुमारास चिपळूण ते पनवेलदरम्यान अनारक्षित मेमू लोकल चालवण्यात येणार आहे. ही मेमू १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर दरम्यान चिपळूणवरून सकाळच्या सुमारास ९ वाजता सुटेल आणि दुपारी २:३० वाजता पनवेलला पोहचेल. तर, पनवेलवरून ही मेमू ट्रेन परतीच्या प्रवासासाठी दुपारी ३:३० ला निघेल आणि रात्री १०:२० पर्यंत चिपळून स्थानकावर तुम्हाला पोहोचवेल. कोकण रेल्वेवरील सर्वच महत्त्वाच्या स्थानकांवर ह्या दोन्हीही विशेष ट्रेनचे थांबे असणार आहेत. या विशेष रेल्वेमुळे प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. (Ganpati Special Trains)