Home गणेशोत्सव Lalbuagcha Raja 2026 : “मुंबापुरी सजली सारी….” मंडपात भव्य त्रिशूळ अन् महाकाय मंदिर प्रवेशद्वार; राजाचा दरबार सजतोय!

Lalbuagcha Raja 2026 : “मुंबापुरी सजली सारी….” मंडपात भव्य त्रिशूळ अन् महाकाय मंदिर प्रवेशद्वार; राजाचा दरबार सजतोय!

0
Lalbuagcha Raja 2026 : “मुंबापुरी सजली सारी….” मंडपात भव्य त्रिशूळ अन् महाकाय मंदिर प्रवेशद्वार; राजाचा दरबार सजतोय!

मुंबई :  कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या (Lalbuagcha Raja) आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई नगरी सज्ज होत असताना, लालबागच्या राजाच्या देखाव्याची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजाचा देखावा अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता, मात्र मंडपातील तयारीचे अनसीन व्हिडिओ समोर आल्यामुळे भाविकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रवेशद्वारावर भव्य त्रिशूळ; शिवमंदिराची संकल्पना असण्याची शक्यता

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohan Pawar (@_rohanpawar20)

व्हायरल झालेल्या व्हिडिओंनुसार, यंदा लालबागच्या राजाचा मंडप एका भव्य आणि दिव्य मंदिराच्या स्वरूपात साकारला जात आहे. मंडपाचे मुख्य प्रवेशद्वार एखाद्या ऐतिहासिक प्राचीन मंदिरासारखे डिझाइन करण्यात आले असून, त्यावर अत्यंत बारीक आणि कलात्मक कोरीव काम दिसत आहे. विशेष म्हणजे, या भव्य मंदिराच्या शीर्षस्थानी एक विशाल ‘त्रिशूळ’ बसवण्यात आले आहे. हे भव्य त्रिशूळ पाहून यंदाचा देखावा भगवान महादेवाच्या मंदिरावर किंवा शिव संकल्पनेवर आधारित असावा, अशी जोरदार चर्चा गणेशभक्तांमध्ये सुरू झाली आहे.

https://www.prahaar.in/2026/09/07/pandharpur-set-for-a-transformation-first-look-of-the-pandharpur-corridor-revealed/

लालबागच्या गल्लीत रोषणाई आणि भव्य छत; राजाच्या स्वागताची जोरदार तयारी

 

View this post on Instagram

 

A post shared by hey.mumbai.10 (@hey.mumbai.10)

केवळ मुख्य मंडपच नाही, तर प्रसिद्ध अशी ‘लालबागची गल्ली’ देखील पूर्णपणे बदलून गेली आहे. भाविकांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी संपूर्ण गल्लीवर एक भव्य आणि भक्कम छत उभारण्यात आले आहे. यासोबतच संपूर्ण परिसरात आकर्षक आणि नयनरम्य रोषणाईची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर उजळून निघणार आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात, हे लक्षात घेऊन व्यवस्थापन अत्यंत वेगाने काम करत आहे.

१४ सप्टेंबरला होणार राजाचे भव्य आगमन; भाविकांचे वेध

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतशी मुंबईतील वातावरण निर्मिती अधिकच रंगतदार होत आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवासाठी लालबागमध्ये राजेशाही तयारी सुरू आहे. जरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखाव्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली, तरीही समोर आलेल्या या दृश्यांमुळे भाविकांना यंदाच्या भव्य आणि दिव्य देखाव्याची पुरेशी कल्पना आली आहे. आता अवघ्या काही दिवसांतच मुंबईचा राजा आपल्या भव्य दरबारात विराजमान होणार असून, सर्व भक्तांचे डोळे लालबागकडे लागले आहेत.