मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. वांद्रे परिसरामध्ये पुढच्या आठवड्यात काही दिवसांसाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे (Mumbai News). त्यामुळे जर तुम्ही वांद्रे आणि परिसरामध्ये ये- जा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढच्या आठवड्यामध्ये माऊंट मेरीची यात्रा आहे (Mount Merry Fair). त्यामुळे यात्रेनिमित्त १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबरदरम्यान वांद्रे आणि परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/07/big-news-sachin-vaze-to-turn-approver-in-the-disha-salian-case/
माऊंट मेरीच्या यात्रेदरम्यान, मोठ्या संख्येने भाविक माऊंट मेरीच्या चर्चला भेट देतात. त्या काळात सर्वांचीच तारांबळ उडते. त्यामुळे सर्व समस्या लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीमध्ये बदल लागू करण्यात आले आहेत. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबरदरम्यान मुंबईकरांनी आणि भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत स्थानिक रहिवाशांचे वाहन, आपात्कालीन सेवांचे वाहन आणि पोलीस वाहन यांना वगळता इतरत्र सर्वच वाहनांना माऊंट मेरी रोडवरून ये- जा करण्यासाठी बंद राहणार आहे. केन रोडवरील वाहतुकीच्या व्यवस्थेतही बदल करण्यात आोला आहे.
https://www.prahaar.in/2026/09/07/outrageous-incident-in-jogeshwari-four-year-old-girl-taken-into-a-room-after-being-found-alone-and/
माउंट मेरी रोडपासून बी. जे. रोडपर्यंत स्थानिक पासधारक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहने वगळता इतर वाहनांसाठी हा वनवे असेल. त्यामुळे बी. जे. रोडकडून केन रोडवर प्रवेश करता येणार नाही. सोबतच, परेरा रोड पूर्वकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी वनवे करण्यात आला असून, बी. जे. रोडकडून या मार्गावर प्रवेश बंद असेल. सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड स्थानिक रहिवाशांची वाहने आणि आपत्कालीन वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. १३ सप्टेंबर ते २० सप्टेंबर यात्रेच्या काळात सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत वांद्रातील काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. यामध्ये के. सी. मार्ग, बॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, माउंट कार्मेल रोड, माउंट मेरी रोड, बी. जे. रोड आणि केन रोड या मार्गांचा समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/09/07/youth-attacks-a-woman-her-daughter-and-a-shopkeeper-in-netivali-kalyan-east-following-an-argument-over-the-use-of-abusive-language-cctv-footage-surfaces/
यात्रेच्या दिवसामध्ये शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी माउंट मेरी रोड, परेरा रोड, केन रोड, हिल रोडवरील सेंट पॉल रोड ते मेहबूब सर्कल परिसर, माउंट कार्मेल रोड, बॅपेल रोड, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, सेंट सेबॅस्टियन रोड, रिबेलो रोड, डॉ. पीटर डायस रोड आणि सेंट पॉल रोड येथे नो- पार्किंग लागू करण्यात आली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा तसेच वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.