दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. हरमनप्रीत ही पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून १५० T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत कर्णधारपद भूषवणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
हरमनप्रीतने आतापर्यंत तब्बल १५० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर या यादीत श्रीलंकेची चमारी अटापट्टू १२१ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग १०० सामन्यांसह तिसऱ्या, तर इंग्लंडची हीदर नाइट आणि रवांडाची डायन बिमनिमाना प्रत्येकी ९६ सामन्यांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या नाणेफेकीत पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
https://www.prahaar.in/2026/09/04/india-vs-pakistan-womens-asia-cup-2026-live-streaming-when-and-where-to-watch-on-tv-and-online/
हरमनप्रीतचा मोठा विक्रम
हरमनप्रीत कौर २०१२ पासून भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात नेतृत्व करत तिने 150 T20I सामन्यांत कर्णधारपद भूषवण्याचा टप्पा गाठला. यापूर्वी पुरुष किंवा महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूने हा आकडा गाठलेला नव्हता.
https://www.prahaar.in/2026/09/04/bcci-takes-major-action-as-62-players-caught-in-age-fraud-rohit-yadav-2-year-ban/
भारताची सेमीफायनलमध्ये आधीच एन्ट्री
या सामन्यापूर्वी भारताने आशिया कपमधील पहिले दोन्ही सामने जिंकले होते. थायलंडवर भारताने ९४ धावांनी, तर हाँगकाँगविरुद्ध १३७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून साखळी फेरी अपराजितपणे पूर्ण करण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना दुबईत ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता (IST) सुरू झाला. दोन्ही संघांमधील ही लढत आशिया कपच्या ग्रुप ए मधील महत्त्वाची लढत आहे. दरम्यान, टॉसच्या वेळी हरमनप्रीत कौर आणि फातिमा सना यांनी नेहमीचा हस्तांदोलनाचा शिष्टाचार केला नाही. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये अलीकडे ही बाब चर्चेत राहिली आहे.